उर्फी जावेदच्या स्पर्धेत उतरली मलायका अरोरा; बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

Updated: Nov 6, 2023, 02:50 PM IST
उर्फी जावेदच्या स्पर्धेत उतरली मलायका अरोरा; बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या

Malaika Arora Look : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता नुकतेच अभिनेत्री तिचे लेटेस्ट फोटो तिच्या सोशल मीडीयावर शेअर केले आहेत. जे पाहिल्यानंतर कोणालाही धक्का बसू शकतो. हे फोटो पाहिल्यानंतर तिची तुलना उर्फी जावेदसोबत केली जात आहे. यावेळी या अभिनेत्रीने असं फोटोशूट केलं आहे की, ते पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोंमध्ये मलायका अरोराचा टॉप समोरच्या बाजूने ओपन आहे कॅमेरासमोर आतापर्यंतच्या सर्वात हॉट अवतारात अभिनेत्री दिसत आहे. एवढंच नाही तर अभिनेत्रीने तिच्या शरीराचा पुढचा भाग केसांनी आणि नेट ड्रेसने झाकला आहे.

अभिनेत्रीने परिधान केला ओपन टॉप
या फोटोमध्ये मलायका अरोरा हिने निऑन रंगाचा श्रग घातला आहे. अभिनेत्रीने हे श्रग समोरच्या बाजूने उघड ठेवलं आहे. यामुळे ती तिचा बोल्ड लूक करत आहे. मलायकाचा हा लूक पाहता तिने समोरच्या बाजूने आपलं शरीर केसांनी झाकलं असल्याचं दिसतंय. मलायकाने या लूकचा फोटो शेअर करताच लोकांनी तिच्या लूकवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विचीत्र स्कर्ट पाहून भुवया उंचावतील
मलायका केवळ समोरच्या बाजूने खूपच बोल्ड दिसत नाही तर तिने घातलेला स्कर्ट पाहूनही तुमच्या भुवया उंचावतील. तिचा हा स्कर्ट अतिशय जाळीदार दिसत आहे. तिच्या या संपुर्ण ड्रेसमध्ये ती अधिक बोल्ड आणि हॉट दिसत आहे. अभिनेत्रीने स्वतः तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर या बोल्ड लूकचे फोटो शेअर केले आहेत.

उर्फीशी होतेय तुलनामलायकाने हे फोटोशूट अमित अग्रवालसाठी केले आहे. मात्र, सेलेब्स अभिनेत्रीच्या लूकचे कौतुक करत असताना काही यूजर्स तिला उर्फीची बहीण म्हणत आहेत आणि काही जण असंही म्हणत आहेत की तिच्यासमोर उर्फी देखील अपयशी ठरली आहे. एका यूजरने लिहिलं आहे की, मलाही फोटोग्राफर बनायचं आहे. तर दुसर्‍या एकाने लिहिलं आहे की, पुढची उर्फी. तिसऱ्याने लिहिले- उर्फीची नवीन बहीण. चौथ्याने लिहिले- उर्फी सुद्धा त्याच्यासमोर अपयशी ठरली. मलायका अरोरा नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x