Urfi Javed Engaged : उर्फी जावेदला कोणी ओळखत नाही, अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. तिच्या विचित्र फॅशन आणि बोल्ड आउटफिट्समुळे ती कायम चर्चेत असते. तिच्या विचित्र अतरंगी कपड्यांमुळे अनेक वेळा नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. पण सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा एका वेगळ्या कारणाने होते. सोशल मीडियावर तिचे काही फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये उर्फी एका मिस्ट्री मॅनसोबत पूजा करताना दिसत आहे. त्यामुळे उर्फीने गुपचूप साखरपुडा केला आणि त्याचा रोका सोहळ्याचे हे फोटो असल्याचं चाहत्यांना वाटत आहे. (urfi javed get secretly engaged roka ceremony private photos viral on internet)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये उर्फी जावेद एका व्यक्तीसोबत हवन कुंडासमोर पूजा करताना दिसत आहे. तिथे एक पंडितही उपस्थित असल्याचं दिसून येतं आहे. या फोटोमुळे नेटकऱ्यांनी चाहत्यांनी अंदाज लावला आहे की, हा व्यक्ती तिच्या होणारा नवरा आहे. त्याशिवाय हे फोटो रोको समारंभाचे असल्याची चर्चा रंगील आहे.
फोटोमध्ये उर्फी हिंदू रितीरिवाजानुसार पूजा करताना दिसत आहे. त्यामुळे तिचं लग्न आंतरजातीय लग्न असल्याचा तर्क चाहत्यांनी लावला आहे. उर्फी नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे चर्चेत असते. विशेष म्हणजे हे फोटो उर्फीची बहीण उरूसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टेट्समध्ये पोस्ट केले आहेत. त्यामुळे चाहत्यांना ही बातमी खरं असल्याचं वाटतं. पण अद्याप अभिनेत्री उर्फीने या गोष्टीची कुठलीही पुष्टी केलेली नाही. त्यामुळे चाहते आता उत्सुक आहे, की कधी या आनंदाच्या बातमीची घोषणा करते.
तर काही नेटकऱ्यांनी तर्क लावला आहे की, हे फोटो तिच्या पुढच्या प्रोजेक्टच्या शूटिंगचे असू शकतात. त्यामुळे आता काय खरं काय खोटं हे उर्फीच सांगू शकते. दरम्यान नुकताच झालेल्या गणेशोत्सवात उर्फी जावेद लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. त्यावेळी मुंबईतील डब्बेवाले नाराज झाले होते.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.