उर्फी जावेदनं पापारांझी समोर ड्रेसमधून 'हे' काय काढलं? ठरतोय चर्चेचा विषय

उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 27, 2022, 01:28 PM IST
उर्फी जावेदनं पापारांझी समोर ड्रेसमधून 'हे' काय काढलं? ठरतोय चर्चेचा विषय title=

मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र, उर्फी चर्चेत असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तिची बोल्ड स्टाइल आणि तिचे कपडे. दरम्यान, यावेळी उर्फीनं कॅमेऱ्यासमोर असं काही केलं की सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 

उर्फीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फी तिच्या ड्रेसमधून काही तरी काढताना दिसते. पापाराझी आले म्हणून उर्फीनं तिच्या हातात असलेले पैसे हे तिच्या ड्रेसमध्ये ठेवले आणि तिथून निघायच्या वेळी ड्रेसमधून ते पैसे काढले. 
उर्फीच्या विचित्र स्टाइलमुळे काही नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी असं काही करणं चुकीचं असतं असं काही लोकांचे म्हणणं आहे तर उर्फीच्या चाहत्यांनी या गोष्टीला पाठिंबा दिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत उर्फीनं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये उर्फी हॉट दिसत आहे. उर्फीची प्रत्येक पोस्ट ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते. उर्फी अजब फोटोशूटमुळे चर्चेत असते. कधी गोणीचा ड्रेस बनवते तर कधी Chain चा.