'पैसे कमावणारा नवरा हवा...' मुलींच्या या इच्छेत गैर काय? सोनालीच्या 'त्या' व्हिडीओवर Urfi Javed चं उत्तर

Urfi Javed नं सोनाली कुलकर्णीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत उर्फीनं तिच मत मांडलं आहे. उर्फीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. काही नेटकऱ्यांनी उर्फीला पाठिंबा दिला आहे तर काही नेटकऱ्यांनी उर्फीला ट्रोल केलं आहे. 

Updated: Mar 18, 2023, 03:09 PM IST
'पैसे कमावणारा नवरा हवा...' मुलींच्या या इच्छेत गैर काय? सोनालीच्या 'त्या' व्हिडीओवर Urfi Javed चं उत्तर title=

Urfi Javed Lashed Out on Sonali Kulkarni : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत सोनाली भारतीय मुली या आळशी असल्याचे म्हटले होते. सोनाली कुलकर्णीनं केलेल्या या तिच्या वक्तव्यानंतर तिच्यावर अनेकांनी खूप टीका केल्या. अनेक महिलांनीच सोनालीवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. आता सोनाली कुलकर्णीच्या या वक्तव्यावर अभिनेत्री उर्फी जावेदनं (Urfi Javed) तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

उर्फीनं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये उर्फीनं सोनालीचा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत उर्फी म्हणाली, 'तू जे काही बोललीस ते किती असंवेदनशील होतं. आधुनिक काळातील महिला त्यांची नोकरी व घरातील कामं दोन्ही सांभाळतात, त्यांना तू आळशी म्हणतेस? चांगले पैसे कमावणारा नवरा हवा, अशी मुलींची इच्छा असेल तर त्यात गैर काय? शतकानुशतके पुरुषांनी स्त्रियांना फक्त मुलं जन्माला घालण्याचं मशीन म्हणून पाहिलं. लग्नात मुलीच्या कुटुंबाकडून हुंडाही मागितला जातो. त्यामुळे महिलांनो, तुमच्या अटी व मागण्या मांडण्यास घाबरू नका. होय, महिलांनी काम केले पाहिजे, हे तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु हा त्यांच्याकडे असलेला एक अधिकार आहे जो प्रत्येकाला मिळत नाही,” असं उर्फीने सोनालीला म्हणाली.

हेही वाचा : VIDEO : Sonalee Kulkarni अंबा देवी मंदिरासमोर गोंधळात सामील

उर्फीच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाली, 'तू जे बोलतेस ते योग्य आहे, मला सुद्धा तेच वाटतंय. ती महिला जे काही बोलली त्या गोष्टीला माझा पाठिंबा नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणी या वर्किंग आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'घरातलं काम असं आहे जे करण्यासाठी खूप वेळ आणि मेहनतही करावी लागते.' तर काही नेटकऱ्यांनी उर्फीला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, तू काय करतेस ते सांग. दुसरा नेटकरी म्हणाला, 'व्हिडीओमध्ये असलेली महिला हेच बोलते. ती सगळ्याच महिलांना बोलत नाही ती काही ठरावीक मुलींविषयी बोलत आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तुझ्याकडून अशाच गोष्टींची मी अपेक्षा करते.'