'कृपया तुम्ही त्यांच्यासारखं होऊ नका...' Jaya Bachchan यांच्यावर भडकली Urfi Javed...

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. साहजिकच व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेकांनी टिप्पणी केली आहे आणि सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असलेल्या उर्फीनं चक्क जया बच्चन यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत हाच व्हिडीओ तिनं तिच्या इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यावेळी उर्फीनं जया बच्चन यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तेव्हा पाहूया उर्फी नक्की यावर काय म्हणते? 

Updated: Oct 19, 2022, 09:51 PM IST
'कृपया तुम्ही त्यांच्यासारखं होऊ नका...' Jaya Bachchan यांच्यावर भडकली Urfi Javed... title=

Urfi Javed on Jaya Bachchan Video: जया बच्चन (Jaya Bachchan Angry) या कायमच आपल्या तापट स्वभावामुळे आजकाल प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर अनेक चाहतेही त्यांच्या या स्वभावावर कायमच नाराज असतात. इंटरनेटवर (Jaya Bachchan Trolled) त्यांना नेहमीच ट्रोल केलं जात. मीडियाशी कायमच दुध्टपणे बोलण्यावरून त्या कायमच ट्रोल होत आल्या आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून आता जया बच्चन या पुन्हा एकदा ट्रोल झाल्या आहेत. पुन्हा एकदा त्यांनी फोटोग्राफर्स आणि मीडियाला धारेवर धरलेलं या व्हिडीओतून पाहायला मिळतं आहे. (urfi javed reacts on jaya bachchan video says dont be like her viral news) 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे (Jaya Bachchan Viral Video). साहजिकच व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेकांनी टिप्पणी केली आहे आणि सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असलेल्या उर्फीनं चक्क जया बच्चन यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत हाच व्हिडीओ तिनं तिच्या इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे (Urfi Javed Instagram Story). यावेळी उर्फीनं जया बच्चन यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तेव्हा पाहूया उर्फी नक्की यावर काय म्हणते? (Jaya Bachchan Vs Urfi Javed)

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

उर्फीची इंटरनेटवर सध्या जोरदार चर्चा आहे. आपल्या विचित्र फॅशनमुळे ती कायमच चर्चेत असते. (Urfi Javed Fashion) त्याचसोबत आता ती आपल्या चित्रविचित्र स्टेटमेंटमुळे तर नेहमीच ट्रोल होत असते. आता जया बच्चन यांच्यावर केलेल्या टीकेमुळे उर्फी ट्रोल झाली आहे. या व्हिडीओमधून दिसून येते की जया बच्चन आपल्या नातीसोबत (Jaya Bachchan with Granddaughter Viral Video) एका कार्यक्रमासाठी हजर झाल्या होत्या. तेव्हा त्यांच्या आजूबाजूला फोटोग्राफर्स गराडा घालतात आणि त्या दोघींचा फोटो काढायला सुरूवात करतात. यावेळी नेहमीप्रमाणे जया बच्चन भडकतात आणि त्यांना वाट्टेल ते बोलायला सुरूवात करतात. एका फोटोग्राफरशी बोलताना त्या म्हणाला की, 'तुम्ही फोटोग्राफर आहेस?, मीडियातून आहेस?' त्यापुढे त्याच्याशी बोलताना जया बच्चन काहीतरी कमेंट करतात या कमेंटमध्ये त्या म्हणतात की, 'हॉप यू फॉल डाऊन... (आशा आहे की तू पडशील)' या कमेंटवरून उर्फीनं आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जया बच्चन यांचा हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर उर्फी म्हणते की, 'जया बच्चन म्हणतात की मला आशा आहे तू खाली पडशील.. हे बोलणं अगदी चुकीचं आहे. आपण कोणाबद्दल असा का विचार करायचा? आपण सगळ्यांनी पुढे जाऊया आणि वर जाऊया.. खाली नाही... मग आपण कॅमेऱ्यासमोर असू वा कॅमेऱ्याच्या मागे... तुम्ही यांच्यासारखं होऊ नका. जया बच्चन मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की, तुम्ही सगळ्यांपेक्षा पावरफुल आहात, तुम्ही सेलिब्रेटी (Celebrity Video) आहात किंवा तुम्ही पैसेवाले आहात म्हणून तुमचा आदर होत नाही अथवा कोणी तुम्हाला आदर देणार नाही... तर तुम्ही इतरांशी किती चांगले वागता त्यावर तुम्हाला इतरांकडून आदर मिळतो.' 

अशा भाषेत उर्फीनं आपली भावना आणि जया बच्चन यांच्यावरील सडकून टीका व्यक्त केली. या व्हिडीओवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून या व्हिडीओ आपल्या आज्जीवर खुद्द नातही नाराज असल्याचं तिच्या चेहऱ्यावर साफ दिसते आहे.