मुंबई : अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या घरी लवकरच चिमुकल्याच्या पाहुणा येणार आहे.
गरोदरपणाचा बाऊ न करता या दिवसांमध्येही उर्मिला सतत अॅक्टीव्ह राहण्याचा प्रयत्न करत आहे. योगा, नृत्य अशा अॅक्टिव्हिटींची लहान लहान व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून उर्मिला सतत शेअर करत असते.
एका पुरस्कार सोहळ्यात उर्मिलाने उपस्थिती लावली होती. त्यानंतर ती लवकरच आई होणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिच्या चाहत्यांना दिली होती.
गरोपणाच्या काळातील एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे 'डोहाळेजेवण' उर्मिला आणि आदिनाथने डोहाळे जेवणाच्या दरम्यान केलेली धमालमस्तीचे काही खास फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. रविवारी संध्याकाळी उर्मिलाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
गरोदरपणातील उर्मिलाच्या चेहर्यावरील तेज आणि निळी साडी यामध्ये उर्मिला अधिकच तेजस्वी दिसत होती.
उर्मिला उत्तम शास्त्रीय नृत्यांगणा सोबतच अभिनेत्री आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांची भेट 'शुभमंगल सावधान' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये असलेले उर्मिला आणि आदिनाथ २०११ साली विवाहबद्ध झाले.