मुंबई : मराठी सिनेमा दिवसेंदिवस उंची गाठताना दिसत आहे. मराठी सिनेमांच कौतुक आता बॉलिवूडकरांनाही वाटू लागलं आहे. अनेक बॉलिवूड कलाकार मराठीत सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. कुणी मराठी सिनेमाची निर्मिती करतंय तर कुणी मराठी सिनेमांत काम करतंय. असं असताना आता एक मराठमोळं नाव जे बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय आहे ते म्हणजे उर्मिला मातोंडकर. उर्मिला लवकरच मराठीत दिसणार आहे.
माधुरी या सिनेमातून उर्मिला मातोंडकर लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती मोहसिन अख्तर मीर हा आपल्या "मुंबापुरी प्रोडक्शन'मधून करणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे करणार आहे. पण सिनेमाची कथा, उर्मिलाची भूमिका याबद्दलची उत्सुकता ताणून ठेवा. कारण ही माहिती अद्यापही गुलदस्तातच आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले असून हा सिनेमा 30 नोव्हेंबर 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
Urmila Matondkar ventures into film production... Presenting the first glimpse of her #Marathi film #Madhuri... Produced by Mohsin Akhtar under the banner of Mumbapuri Productions... Directed by Swapna Waghmare Joshi... 30 Nov 2018 release. pic.twitter.com/feZa06fcTb
— taran adarsh (@taran_adarsh) October 10, 2018
काश्मिरी व्यावसायिक आणि मॉडेल असणारे मोहसिन अख्तर मीर यांच्यासाठी मराठी चित्रपट निर्मित करणे ही नक्कीच खास बाब असेल. मराठी चित्रपटसृष्टीचे होणारे कौतुक पाहता, मोहसिन यांना मराठी चित्रपटाविषयीचे कुतूहल निर्माण झाले. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत निर्मितीविषयी काहीही अनुभव नसताना देखील मराठी मातीतील कथा, मराठी कलाकारांचे अभिनय कौशल्य आदी गोष्टींमुळे ‘माधुरी’ या चित्रपटाची निर्मिती करण्याचा त्यांनी निर्णय पक्का केला. मोहसिन अख्तर मीर यांना जशी मराठी चित्रपटाप्रती आवड आहे, त्याचप्रमाणे मुंबईविषयी देखील त्यांना आपुलकी आणि जिव्हाळा आहे हे त्यांच्या ‘मुंबापुरी प्रॉडक्शन हाऊस’ या नावावरुन लगेच कळून येते.