मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा (maharashtra political crisis) भूकंप घडला आहे. राज्यातील सत्तानाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा (Cm Uddhav Thackeray Resign) राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्द्वारे जनतेशी संवादादरम्यान हा मोठा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासह आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. उर्मिला म्हणाल्या, 'धन्यवाद उद्धव ठाकरेजी. तुमच्या नेतृत्वामुळे आपले राज्य कोविडसारख्या कठीण काळातही जातीयवाद आणि द्वेषापासून दूर राहिले. तुमचे नेतृत्व अनुकरणीय, धाडसी, प्रतिक्रियात्मक, पारदर्शी, संवादप्रिय होते. जय महाराष्ट्र !'
Thank you @OfficeofUT ji for your leadership in the most trying times of covid n keeping our state away from communal hatred n bigotry. Your leadership has been exemplary, unbiased, courageous, responsible,transparent,communicative
Jai Maharashtra pic.twitter.com/DQUzw4PBzT— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) June 29, 2022
सध्या उर्मिला मातोंडकर यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आलं होतं. सत्तेत असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यात नेमकी शिवसेना कुणाची यावरून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. मात्र अखेर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर या सर्व राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाला आहे.
पुढची भूमिका काय?
मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी आपली पुढील रणनिती स्पष्ट केली आहे. आता पुढे मी शिवसेना भवनावर जनतेच्या सेवेसाठी उपस्थित असणार आहेत. शिवसेनेची जबाबदारी सांभाळणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.