बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela) गेल्या काही दिवसांपासून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. उर्वशीच्या सोशल मीडिया (Social Media) पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. उर्वशीच्या (urvashi rautela) पोस्टसाठी तिला या ना त्या कारणाने खूप ट्रोल केले जात आहे. याआधी उर्वशीच्या पोस्ट्सचा संबंध क्रिकेटर ऋषभ पंतशी (Rishabh Pant) जोडला जात होता. मात्र यावेळी उर्वशी तिच्या TEDx भाषणामुळे चर्चेत आहे. उर्वशीवर TEDxमधील भाषण दुसऱ्या वक्तत्यांकडून चोरल्याचा आरोप आहे. यावरुन आता तिला ट्रोल केले जात आहे. (Urvashi Rautela accused of stealing TEDx talk speech)
काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेलाचा (urvashi rautela) TEDx व्हिडिओ समोर आला होता मात्र त्यावेळी त्याची फारशी चर्चा झाली नव्हती. आता उर्वशीवर भाषण चोरल्याचा आरोप होत आहे. सोशल मीडिया युजर्सना असे म्हणायचे आहे की उर्वशीने TEDx टॉकमध्ये दिलेले भाषण कॉपी केले आहे. उर्वशीचे भाषण हे इसाबेल अलेंडे, चिमामंदा न्गोजी एडिची, डॅनियल एच पिंक, ब्रेन ब्राउन यांसारख्या अनेक मोठ्या वक्त्यांची नक्कल असल्याचे बोलले जात आहे.
उर्वशी अशा प्रकारच्या आरोपांमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सप्टेंबर 2018 मध्ये उर्वशी रौतेला एका पोस्ट कॉपी केल्यामुळे चर्चेत आली होती. उर्वशीने तिची एक इंस्टा पोस्ट, सुपरमॉडेल गिगी हदीदची पोस्ट कॉपी केली होती. मात्र, ट्रोल झाल्यानंतर उर्वशीने ही तिच्या टीमची चूक असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उर्वशी ऋषभ पंतचा पाठलाग करून त्याच्यासाठी दुखद पोस्ट टाकत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तिला खूप ट्रोलही केले जात आहे. यावर नुकतीच प्रतिक्रिया देताना उर्वशीने, 'आधी इराणमध्ये महसा अमिनी आणि आता भारतात माझ्यासोबत असे होत आहे, मला स्टॅकर म्हणत माझा छळ केला जात आहे. कोणीही माझी काळजी घेत नाही आणि मला कोणी पाठिंबा देत नाही. एक सशक्त स्त्री तीच असते जी मनापासून प्रेम करते. हास्याप्रमाणेच अश्रूही वाहतात, असे म्हटलं आहे. अमिनाच्या हत्येनंतर इराणच्या महिला हिजाबविरोधी आंदोलनात उतरल्या आहेत.