उर्वशी रौतेलाने व्हिडिओ चालू ठेवत केलेलं कृत्य पाहून चाहते हैराण

 बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 

Updated: Oct 12, 2022, 09:25 PM IST
उर्वशी रौतेलाने व्हिडिओ चालू ठेवत केलेलं कृत्य पाहून चाहते हैराण title=

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या बोल्ड स्टाईलने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. तिच्याकडे परफेक्ट फिगर आहे आणि ती ही फिगर फ्लॉंट करताना इंटरनेटवर दहशत निर्माण करते.

याचं उदाहरण तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतं. उर्वशी खूप सुंदर आहे आणि ती एक उत्तम डान्सर देखील आहे. पण काही काळापूर्वी तिच्यावर डान्सचा असा राग आला की तिने कॅमेऱ्यासमोरच आपला टॉप काढून फेकून दिला. उर्वशी रौतेलाचा हा डान्स व्हिडिओ खूप जुना आहे. पण या व्हिडिओमध्ये तिची डान्सची आवड स्पष्टपणे दिसत आहे. उर्वशीचा हा हॉट डान्स व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

उर्वशीचा डान्स व्हिडिओ
बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याशी संबंधित अपडेट्स नेहमीच लोकांसोबत शेअर करत असते. तिच्या बोल्ड अभिनयामुळे ती सोशल मीडियावर राज्य करते. पण अनेकवेळा तिला तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे तिला ट्रोल व्हावं लागलं आहे.  आम्ही तुम्हाला सांगतो की, उर्वशी रौतेलाने काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते.

उर्वशीने टीशर्ट काढलं
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती खूप छान डान्स करताना दिसत आहे. पण अचानक नाचत असताना ती तिचा टी-शर्ट काढून फेकते. या व्हिडिओमध्ये ती तिच्या सुपरहिट 'बिजली की तार' गाण्यावर डान्स करत असल्याचं आपण पाहू शकतो. हे गाणं गायिका नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी गायलं आहे. उर्वशीवरच हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.