देसी गर्लचा देसी लुकॅ! फोटो पाहून चाहते थक्क

पिवळी साडी...काळी टिकली..., प्रियंका चौप्राचा साडीतला लुक पाहून चाहते थक्क, फोटो पाहिलेत का तुम्ही? 

Updated: Oct 12, 2022, 10:07 PM IST
देसी गर्लचा देसी लुकॅ! फोटो पाहून चाहते थक्क

मुंबई : देसी गर्ल प्रियंका चौप्रा (Priyanka Chopra) गेल्या अनेक वर्षापासून बॉलिवूडपासून दुर आहे. मात्र सोशल मीडियावर ती अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता असाच तिने एक फोटो पोस्ट केला आहे. या तिच्या फोटोंची एकच चर्चा आहे.

हे ही वाचा : Gandi Baat फेम अभिनेत्रीचा बोल्ड लुक, फोटो पाहून चाहते थक्क

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra Saree Look) ही अशी एक अभिनेत्री आहे, जिने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपलं नाव गाजवलं आहे. ही अभिनेत्री केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जात नाही, तर ती तिच्या सौंदर्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे. वेस्टर्न असो की देसी, प्रियांका तिच्या प्रत्येक लूकने धुमाकूळ घालत असते. नुकतेच तिने तिचे देसी लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंची एकच चर्चा आहे. 

हे ही वाचा : Urvashi Rautela ने ऋषभ पंतसाठी ठेवला करवा चौथ?, म्हणते, 'आयुष्यभराची साथ...'

देशात 13 ऑक्टोबरला करवा चौथचा सण (karwa chauth) साजरा होणार आहे. या सणापुर्वीच प्रियांका (Priyanka Chopra) देसी लूकमध्ये दिसली आहे. प्रियांकाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने पिवळी साडी नेसली आहे. या साडीसह तिने कपाळावर काळी टिकली लावली आहे. यासोबत तिचा लुक पुर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहेत. या साडीत ती खुपच खुलून दिसत आहेत. चाहत्यांना तिचा हा लुक खुपच आवडला आहे. 
 
हा फोटो शेअर करत प्रियांकाने (Priyanka Chopra)  कॅप्शनमध्ये लिहिले की, "सर्व रात्री." त्याचबरोबर तिने या सुंदर साडीसाठी तिची चुलत बहीण मन्नारा चोप्राचे आभार मानले आहेत. मन्नाराचा उल्लेख करताना प्रियांकाने लिहिले की, माझ्या या साडीसाठी मन्नाराला धन्यवाद.

मन्नाराकडून फोटो शेअर 
प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) हा फोटोही मन्नारा चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करत मन्नाराने लिहिले की, “हा रंग तुमच्यासाठी आहे मिमी दीदी (प्रियांका). तू खूप छान दिसतेस. दिवाळीच्या आधी, मी तुम्हाला एक गुलाबी रंगाची साडीदेखील पाठवणार असल्याचे ती म्हणत आहे.

हे ही वाचा : क्रिकेटच्या मैदानात राडा! प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांमध्ये भिडले, पाहा VIDEO

दरम्यान देसी लूकमध्ये प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)  खूपच आकर्षक दिसत आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना खुपच आवडला आहे.