कोहली सोबत 'असा' फोटो काढल्याणे अभिनेत्री उर्वशी रौतेला ट्रोल

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी पोहोचली होती उर्वशी रौतेला

Updated: Jun 18, 2019, 08:44 PM IST
कोहली सोबत 'असा' फोटो काढल्याणे अभिनेत्री उर्वशी रौतेला ट्रोल title=

मुंबई : रविवार १६ जून देशामधील क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठा दिवस होता. मॅनचेस्टरला या दिवशी भारत आणि पाकिस्तानमध्ये वर्ल्डकपमधील सामना रंगला होता. भारतातील अनेक सेलिब्रटी हा क्रिकेट सामना पाहाण्यासाठी मॅनचेस्टरला पोहचले होते. त्यात उर्वशी रौतेला ही अभिनेत्री देखील होती. यादरम्यान उर्वशीने भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या पुतळ्यासोबत फोटो काढला. ज्यामध्ये ती विराटच्या पुतळ्याची गळाभेट घेताना दिसत आहे.

उर्वशीने तिचे फोटो इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. काही क्रिकेट चाहत्यांना आणि तिच्या फॅन्सला तिचे हे फोटो आवडले. मात्र काही नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं. या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट आल्या. या फोटोवरुन काही जणांनी तर अनुष्काला देखील सल्ले दिले आहेत. 

'विराटला बिघडवू नकोस., विराट तूझ्या 'जीजाजी' सारखा आहे., तू विराटला अॅफॉर्ड नाही करू शकत., मागे सावलीत अनुष्का लाटणं घेऊन उभी आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या फोटोवर आल्या. 

उर्वशीचा आगामी पागलपंती हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनीस बज्मी यांनी दिग्दर्शत केला आहे. जॉन अब्राहम या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. 

उर्वशीचा पहिला चित्रपट 'सिंग साहब द ग्रेट' हा असून तिने अनेक चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये 'सनम रे', 'ग्रँड मस्ती' आणि 'हेट स्टोरी ४' सारख्या चित्रपटाचा समावेश आहे. तिने काही चित्रपटात आयटम सॉन्गस् देखील केले आहे.