उर्वशी रौतेलाच्या पोटावर माणसाने मारले बॉक्सिंग पंच , व्हीडिओत उर्वशीची अशी हालत झालीय...

तिच्या बोल्डलूकला चाहत्यांकडून पसंत केले जाते. तसेच लोकं तिच्या लूकची प्रशंसा करताना थांबत नाहीत.

Updated: Jun 10, 2021, 07:03 PM IST
उर्वशी रौतेलाच्या पोटावर माणसाने मारले बॉक्सिंग पंच , व्हीडिओत उर्वशीची अशी हालत झालीय...

मुंबई : उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमी तिच्या फॅन्ससाठी फोटो किंवा व्हीडिओ शेअर करत असते. तिच्या बोल्डलूकला चाहत्यांकडून पसंत केले जाते. तसेच लोकं तिच्या लूकची प्रशंसा करताना थांबत नाहीत. सध्या उर्वशीचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती तिच्या पोटावर जोर जोरात मारत आहे. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर तिचे फॅन्स थक्कं झाले आणि त्यांना आश्चर्य वाटत आहे.

काय आहे या व्हीडिओत?

उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा जिममधील एक व्हीडिओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये ती भिंतीला टेकून उभी आहे आणि एक व्यक्ती जो कदाचित तिचा जिम ट्रेनर असावा. तो तिच्या पोटावर जोर जोरोत बाँक्सिंग ग्लवझ घालून मारत आहे. ज्यामध्ये सुरवातील उर्वशी तो मार सहन करते, परंतु काही काळाने तिला असहाय्य झाल्याने ती बाजूला होते.

हा व्हीडीओ उर्वशीने इंस्टग्रामनर टाकल्यानंतर लोकं तिची खूप प्रशंसा करत आहेत. ती इतक्या ताकतीने हा मार सहन करते जे कौतुकास्पद आहे.

उर्वशीने हा व्हीडिओ शेअर करताना सांगितले की, ती तिच्या पुढील प्रोजेक्ट, म्हणजेच एका अ‍ॅक्शन फिल्मची तयारी करत आहे. उर्वशी ही एक सोशल मीडिया सेन्सेशन आहे. इन्स्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अलीकडेच उर्वशीचे इन्स्टाग्रामवर 37 मिलियन  फॉलोअर्स आहेत. सध्या उर्वशीचा पूलमधील हॉट व्हीडिओही जोरदार व्हायरल झाला आहे.

उर्वशीचे व्हर्सासे बेबी हे गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. या गाण्यात तिच्याबरोबर इजिप्शियन अभिनेता आणि गायक मोहम्मद रमजान देखील दिसले आहे. या दोघांच्या या बोल्ड गाण्याला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. इतकेच नाही तर या गाण्यात उर्वशीने घातलेला ड्रेस देखील बराच चर्चेत होता. कारण उर्वशीने गाण्यात घातलेला तो ड्रेस 1 वर्षापासून बनवला जात होता आणि ज्याची किंमत 15 कोटी आहे.

भानुप्रियाच्या शेवटच्या फिल्म व्हर्जनमध्ये उर्वशीने काम केले होते परंतु त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. आता तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच तमिळ आणि तेलगू सिनेमात पदार्पण करणार आहे. ब्लॅक रोज या चित्रपटाद्वारे ती तेलुगूमध्ये पदार्पण करणार आहे.

त्याचबरोबर उर्वशी इन्स्पेक्टर अविनाश या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ज्यात तिच्यासोबत रणदीप हूडा मुख्य भूमिकेत आहे. यात ती रणदीपच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.