मोहम्मद शमीच्या पत्नीचा बोल्ड लूक, हसीन जहांच्या अदांवर चाहते घायाळ

मोहम्मद शमीची पत्नी हसीनच्या बोल्ड लूकची चर्चा

Updated: Jun 10, 2021, 10:28 AM IST
मोहम्मद शमीच्या पत्नीचा बोल्ड लूक, हसीन जहांच्या अदांवर चाहते घायाळ

मुंबई: मोहम्मद शमीची पत्नी आपल्या लूक आणि वेगवेगळ्या फोटोशूटमुळे कायमच चर्चेत राहिली आहे. मोहम्मद शमीची पत्नी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळे फोटो शेअर करत असते. मोहम्मदच्या पत्नीच्या बोल्ड फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 

हसीन जहां पेशानं मॉडेल होती. कोलकाता नाईट रायडर्ससाठी ती चिअर गर्ल म्हणून देखील काम करत होती. ती आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देत असते. सध्या तिच्या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तिच्या दिलखेच अदांसमोर चाहते घायाळ झाले आहेत. 

मोहम्मद शमीसोबत झालेल्या वादानंतर हसीनं जास्त चर्चेत आली. त्यानंतर तिने आपल्या मुलीला घेऊन वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद आणि हसीनमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. दोघांनी एकमेकांना अजून तलाक दिला नाही मात्र ते दोघंही वेगळं राहात आहेत. 

हसीनने मोहम्मद शमीवर केला होता गंभीर आरोप

मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांचे 7 एप्रिल 2014 रोजी लग्न झालं होतं. काही वर्षानंतर शमीच्या पत्नीने त्याच्यावर इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. हसीननेही शमीवर बलात्कारासारखे गंभीर आरोप केला आहे.

मोहम्मद शमीवर बलात्काराचा आरोप

मोहम्मद शमीवर 2018मध्ये पत्नी हसीन जहांने मारहण, बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला. या आरोपानंतर शमीवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हसीन जहांने शमी आणि त्याच्या भावाविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. शमीविरोधात कलम 498 अ आणि कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा भाऊ हासिद अहमद विरूद्ध कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.