भंगार विकून घर चालवायची, आज दररोज कमवते दीड लाख रुपये, कोट्याधीश असलेल्या 'या' चिमुकलीला ओखळलं का?

फोटोमधील चिमुकली ही एक टीव्ही जगतातील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्याने आणि स्माईलने ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण तिच्या सुरुवातीचा काळ हा खूप संघर्षाने भरलेला होता.   

नेहा चौधरी | Updated: Jun 28, 2024, 12:05 PM IST
भंगार विकून घर चालवायची, आज दररोज कमवते दीड लाख रुपये, कोट्याधीश असलेल्या 'या' चिमुकलीला ओखळलं का? title=
Used to run a house by selling scraps today earns one and a half lakh rupees daily divyanka tripathi networth

Divyanka Tripathi Networth : टीव्ही इंडस्ट्री अशी दुनिया आहे. ज्यामधून अनेक कलाकार एक रात्रीत घरोघरी पोहोचतात. हे कलाकार आणि त्याचे पात्र प्रत्येक घरात चर्चेचा विषय असतात. रात्रीच्या वेळी घरातील सगळी मंडळी जेवणाच ताट घेऊन टीव्ही समोर बसतात. ही कलाकार जणू त्यांच्या घरातील एक सदस्य असतात. उंच शिखरावर पोहोचण्यापूर्वी या कलाकारांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. आपण आज ज्या चिमुकलीबद्दल बोलत आहोत ती आहे अभिनेत्री आहे दिव्यांका त्रिपाठी, 'बनू में तेरी दुल्हन' या हिट टीव्ही शोमधून ती रुपेरी परद्यावर झळकली. पण तिला खरं ओळख मिळाली डॉ. इशिता या पात्रामुळे. ये हे मोहब्बते या मालिकेतून तिच्या खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. 

पण एकेकाळी भंगार विकून...

होय, आज तरी दिव्यांका त्रिपाठी टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असली तरी, एकेकाळी या सौंदर्यावतीवर खूप वाईट वेळ आली होती. दिव्यांकाने त्या वेळेचा धैर्याने सामना करुन खूप मेहनतीने आज यशाच शिखर गाठलंय. आता या अभिनेत्रीचे नाव टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दिव्यांका त्रिपाठी दररोज दीड लाख रुपये कमावत असून तिच्या नावावर कोट्यावधी संपत्ती आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya)

एका मुलाखतीत तिच्या संघर्षाच्या दिवसांचा खुलासा करताना दिव्यांका त्रिपाठी म्हणाली होती, 'माझ्या आयुष्यात एक वेळ आली जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते आणि त्या दिवसात मी जे काही कमावले ते सोन्याचे नाणे विकत घ्यायचे आणि नंतर जेव्हा जेव्हा मी पैशांची गरज असायची, मी माझ्या उदरनिर्वाहासाठी ती नाणी विकेन. माझ्या आयुष्यातही एक काळ असा आला जेव्हा मी भंगार विकून पैसे गोळा केलंय.'

आज दिव्यांका त्रिपाठी लक्झरी लाइफ जगतेय

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात. म्हणूनच माझ्या आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग आला तेव्हा मी त्याचा धैर्याने त्याला समोरे गेली. दिव्यांका त्रिपाठीने अभिनेता विवेक दहियासोबत लग्न केलंय. आज ही अभिनेत्री अतिशय आलिशान जीवन जगतंय. पती विवेकसोबत 4 BHK फ्लॅटमध्ये तिचा संसार सुरु आहे. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

दिव्यांका त्रिपाठीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट शो दिले आहेत. 'ये है मोहब्बतें'मध्ये इशिता भल्लाची भूमिका साकारून तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. खतरो के खिलाडीमधून तिने तिची वेगळी ओळख निर्माण केली. रिपोर्ट्सनुसार, दिव्यांका त्रिपाठीची एकूण संपत्ती 48 कोटी रुपये आहे. अभिनेत्रीचे उत्पन्न टीव्ही मालिका आणि रिॲलिटी शोमधून मिळतं. अभिनेत्री दररोज 1.5 लाख रुपये फी घेते, याशिवाय दिव्यांका ब्रँड प्रमोशन आणि प्रायोजकत्वातूनही भरपूर कमाई करते.