'उतरन'मधील इच्छा झाली एवढी मोठी

पाहा फोटो 

'उतरन'मधील इच्छा झाली एवढी मोठी  title=

मुंबई : टीव्ही मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय मालिका 'उतरन' मधून घराघरात आपली निर्माण करणारी इच्छा.... म्हणजे स्पर्श कंचनदानी आता पुन्हा एकदा पाच वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. स्पर्श लवकरच 'विक्रम बेताल की रहस्य गाथा' मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये स्पर्श प्रेत परीच्या रुपात दिसणार असून ती आपल्या काही आयडिया राजा विक्रम देऊन त्याची मदत करते. या अगोदर तिला 'परवरिश' या मालिकेत पाहायला मिळालं आहे. 

स्पर्शने सांगितलं की, हा शो माझ्यासाठी एक चांगली संधीच नाही तर टेलीव्हिजनवर पुन्हा एकदा येण्यासाठी योग्य मंच आहे. माझे आई-वडिल मला लहानपणापासून विक्रम आणि बेतालची गोष्ट सांगत असे. आणि आता यामध्ये मला काम करण्याची संधी मिळत आहे. हे माझीसाठी खूप मोठी संधी आहे. 

या मालिकेत मकरंद देशपांडे बेतालची भूमिका साकारत आहेत. तिने सांगितलं की, मी मकरंद यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. मी त्यांना कायमच माझ्या आदर्शच्या रुपात पाहिलं आहे. मला सर्व आव्हान आणि रोमांच गोष्टींची उत्सुकता आहे.