Uttarkashi Tunnel Collapse Social Up Coming Movie: उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यामध्ये 2 आठवड्यांहून अधिक काळापासून अडकून पडलेल्या 41 मजुरांची मंगळवारी सुखरुप सुटका करण्यात आली. रात्री आठच्या सुमारास या 41 मजुरांना एक एक करुन बाहेर काढण्यात आलं आणि देशाने सुटकेचा निश्वास सोडला. बोगदा कोसळल्यानंतर 17 दिवस अंधारात अकलेल्या मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात एकच जल्लोष झाल्याचं पाहायला मिळालं. मोहिमेच्या अंतिम टप्प्यामध्ये रॅट होल मायनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या मोहिमेसाठी भारत सरकारने देश-विदेशातून तज्ज्ञांना पाचारण केलं होतं. सिलक्यारा-डंडालगाव येथील बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांना सोडवण्यासाठी जगप्रसिद्ध टनल एक्सपर्ट अर्नोल्ड डिक्स यांचीही मदत घेण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली.
सिलक्यारा-डंडालगाव बोगद्यासंदर्भातील या बचाव मोहिमेवर आधारित चित्रपट लवकरच तयार केला जाईल अशी शक्यता आता अनेकांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील काही पोस्ट व्हायरल होत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावरील दाव्यांनुसार सिलक्यारा-डंडालगाव मोहिमेवरआधारित चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार हा चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा टनल एक्सपर्ट अर्नोल्ड डिक्स यांची भूमिका साकारणार आहे.
अर्थात अक्षय कुमारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. कोणत्याही वृत्तवाहिनीने अथवा वेबसाईटने असं वृत्त दिलेलं नाही. आम्हीही या वृत्ताला दुजोरा देत नाही. मात्र चाहत्यांनी केलेला हा दावा हा हलक्यापुलक्या दृष्टीकोनातून केलेलं सेलिब्रेशन आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. योगेश सांडगे नावाच्या व्यक्तीने, "अक्षय कुमार अर्नोल्ड डिक्स यांची भूमिका आगामी 'मिशन सुरंग' चित्रपटात साकारणार आहे. चित्रपटाच्या शुटींगची जागाही ठरली आहे," अशी पोस्ट केली आहे.
Breaking : Akshay Kumar to play Arnold Dix in his next movie “ Mission Surang” , Shooting location already decided. #UttarakhandTunnelRescue#UttarkashiRescue #Uttarkashi #uttarkashirescueoperation pic.twitter.com/MsujoBgqLb
— aaplach_yogesh (@yogesh_sandge) November 28, 2023
काका रामदेव या पॅरडी अकाऊंटवरुन, "अक्षय कुमार अर्नोल्ड डिक्स यांची भूमिका साकारणार आहे. अक्षय कुमार फक्त त्याची दाढी योग्यपद्धतीने वाढण्याची वाट पाहतोय," असं मजेदार ट्वीट केलं आहे. अनेकांनी अशी ट्वीट केली आहेत. त्यापैकी काही मोजक्या पोस्ट पाहूयात...
1)
Akshay Kumar is all set to play the role of Arnold Dix in his upcoming movie.
He's just waiting to grow his beard for perfection. #UttarakhandTunnelRescue pic.twitter.com/NvI2d50Rle— काका आरामदेव (Parody) (@KakaAramdevp) November 28, 2023
2)
Akshay Kumar all set to play the role of Arnold Dix in his upcoming flop movie.#UttarakhandTunnelRescue pic.twitter.com/WgCm20htiI
— Azy (@AzyConTroll_) November 28, 2023
3)
Breaking : Akshay Kumar to play Arnold Dix in his next movie “ Mission Surang” , Shooting location already decided. #UttarakhandTunnelRescue pic.twitter.com/fKaXlCXfRE
— Roshan Rai (@RoshanKrRaii) November 28, 2023
उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर स्थित, सिल्क्यरा बोगदा हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम 'ऑल वेदर रोड' प्रकल्पाचा एक भाग आहे. ब्रह्मखल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेला हा बोगदा 4.5 किलोमीटर लांब आहे. 12 नोव्हेंबर रोजी बोगद्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे 41 कामगार बोगद्यात अडकले. बोगद्याच्या सिलक्यारा दिशेकडील सुमारे 60 मीटरचा भाग खचल्याने 41 कामगार अडकले. बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या 2 किलोमीटर लांबीच्या भागात हे कामगार अडकले असल्याने ते आतमधील पोकळीत सुरक्षित राहिले. त्यांची सुटका करण्यासाठी 17 दिवसांपासून बचावकार्य सुरू होतं. या मोहिमेला मंगळवारी यश आलं.