वैभव-दियाच्या लग्नावर एक्स वाईफ म्हणाली....

15 फेब्रुवारीला वैभव आणि दियाने लग्न केलं.   

Updated: Feb 18, 2021, 12:58 PM IST
वैभव-दियाच्या लग्नावर एक्स वाईफ म्हणाली....

मुंबई : बॉलिवूडमध्ये प्रत्येक दिवशी काही नाती जुळून येतात, तर काही नाती कायमची तुटतात आणि त्यानंतर मागे राहतात त्या फक्त आठवणी. असचं काही झालं आहे, उद्योगपती  वैभव रेखीची पत्नी  सुनैना रेखीसोबत. अभिनेत्री दिया मिर्झा आणि वैभव 15 फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात अडकले. अगदी ठराविक लोकांच्या उपस्थितीत हा विवाह संपन्न झाला. त्याच्या विवाहानंतर वैभवच्या पहिल्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. 

सुनैना म्हणाली, 'वैभवने दिया सोबत लग्न केलं आहे. म्हणून अनेकांनी मला फोन करून विचारलं की मी आणि समायरा ठिक आहे ना?' सुनैनाच्या जवळच्या व्यक्तींनी काळजी व्यक्त केल्याबद्दल तिने सुनैनाने सर्वांचे  आभार मानले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

'मी ठिक आहे. समायरा देखील आनंदी आहे. काही व्हिडीओमध्ये मी तीला फूल फेकताना पाहिलं. समायराने कधीही तिच्या आई-वडिलांमध्ये प्रेम पाहिले नाही. आता यावेळी ते तिला पाहायला मिळेल ही माझ्यासाठी आनंदीचा बातमी आहे.' असं म्हणत सुनैनाने तिच्या भावना व्यक्त केल्या. 

ऑक्टोबर 2014 मध्ये दियाने उद्योगपती साहिल संघा बरोबर लग्न केलं. पण लग्नानंतर अवघ्या 5 वर्षांमध्ये म्हणजे 2019 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता मागचं सगळं विसरत तिने वैभवसोबत तिच्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x