या टीव्ही अभिनेत्रीवर राख्या विकण्याची वेळ, मजबुरीने सुरु केला व्यवसाय

टीव्ही अभिनेत्री वंदना विठलानी (Vandana Vithlani) ही तिच्या 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील व्यक्तिरेखेमुळे उर्मिला म्हणून ओळखली जाते.  

Updated: Jul 31, 2021, 10:06 AM IST
या टीव्ही अभिनेत्रीवर राख्या विकण्याची वेळ, मजबुरीने सुरु केला व्यवसाय

मुंबई : टीव्ही अभिनेत्री वंदना विठलानी (Vandana Vithlani) ही तिच्या 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील व्यक्तिरेखेमुळे उर्मिला म्हणून ओळखली जाते. वंदना आजकाल दोन टीव्ही सीरियल्समध्ये काम करत आहे, त्यापैकी एक पंड्या स्टोअर आहे आणि दुसरी सिरीयल लवकरच छोट्या पडद्यावर लवकरच येणार आहे, तिचे नाव आहे 'तेरा मेरा साथ रहे'. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिनयाबरोबरच वंदना राखी विकण्याचेही काम करत आहे.

सेटवर राख्या बनवल्या जातात

वंदना विठलानी  (Vandana Vithlani)आजकाल तिच्या शूटमध्ये खूप व्यस्त आहे, पण शूटिंगनंतर ती राखी बनवण्यासाठी आणि ती ऑनलाईन विकण्यासाठी वेळ काढते. सेटमध्येही ती उरलेल्या वेळेत राख्या बनवताना दिसते. वंदना एक अंकशास्त्रज्ञ आहे आणि तिला राखी बनवण्याचा विचार गेल्यावर्षी लॉकडाऊनच्यावेळी तिच्याकडे काम नसताना आला.

गेल्यावर्षी काम सुरु झाले

गेल्यावर्षी, अभिनेत्रीने नाव आणि जन्मतारखेच्या लकी नंबरनुसार राख्या बनवल्या, जेणेकरुन तिला काही आर्थिक मदत मिळू शकेल. आज जेव्हा तिच्याकडे काम आहे, तिने राखी बनवण्याचे काम थांबवलेले नाही. वंदना विठलानी यांनी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की कोरोनामुळे अनेकांना आपला व्यवसाय बदलावा लागला. कारण कमाई थांबली होती. आणि खर्च  सारखा वाढत होता. मलाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

लोकांना काम आवडते

वंदना विठलानी पुढे म्हणाली की, आज माझ्याकडे दोन शो आहेत. पण मी अजूनही राख्या बनवत आहे आणि मला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मी दोन-तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर राखीसाठी पोस्ट केली होती आणि आता मला 20 राखीची ऑर्डर मिळाली आहे. वंदना म्हणाली की गेल्या वर्षी कोरोना साथीने जगाची गती थांबवली होती, म्हणून आज माझ्याकडे काम आहे, याचा अर्थ असा नाही की मी थांबावे. मी माझी ही प्रतिभा वाढवत आहे. मी दागिनेही तयार केले आहेत. आता मी थांबणार नाही, असे वंदना विठलानी यांनी सांगितले.