श्रद्धा कपूर कोणासोबत करते चॅट? खासगी मेसेज सोशल मीडियावर व्हायरल

या खास इमोजीने सेव्ह केला खास व्यक्तीचा नंबर

Updated: Jul 31, 2021, 09:22 AM IST
श्रद्धा कपूर कोणासोबत करते चॅट? खासगी मेसेज सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : अभिनेते शक्ती कपूरची मुलगी आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फर मोठी आहे. जेव्हा श्रद्धा घराबाहेर पडते, तेव्हा तिच्या मागे चाहते आणि कॅमेरामॅनची एकचं गर्दी असते. तिच्यासोबत एक फोटो क्लिक करण्यासाठी आतुर असतात. नुकताचं असं काही झालं ज्यावर तुमचा देखील विश्वास  बसणार नाही. खुद्द श्रद्धाला देखील ठावूक नसेल तिच्यासोबत हे काय होत आहे. 

दरम्यान श्रद्धा कपूरला चित्रीपटाच्या सेट पपाराजींनी स्पॉट केलं. यावेळी ती कोणासोबत तरी चॅट करत होती. याचदरम्यान तिच्यासोबत तिचे चॅट देखील कॅमेऱ्यात कैद झालं आहेत. सध्या श्रद्धाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खास इमोजीने श्रद्धाने खास व्यक्तीचा नंबर सेव्ह केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

श्रद्धा म्हणते, 'मी माझ्या आयुष्यात काधी तुझ्यासारख्या व्यक्तीला भेटली नाही.' श्रद्धाच्या या मेसेजला उत्तर येतो, 'मला फार आनंद आहे तु माझ्याबद्दल असा विचार करते. '  यानंतर श्रद्धा म्हणते, 'तु खरंच ऐकतो.. असं कोणी नाही. तुझ्यामुळे मला कायम स्पेशल फिल होतं. ' यावर लाल रंगाचं बदाम येतं. 

श्रद्धाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, श्रद्धा प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. श्रद्या कायम त्याच्यासोबत बोलत असते. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.