VIDEO: 'अनेकदा अश्लील फोटो पाठवले जातात'; चॅट शोमध्ये वरुणचा खुलासा

नकारात्मक कमेंट करणाऱ्या लोकांकडे लक्ष देत नाही

Updated: Apr 11, 2019, 11:45 AM IST
VIDEO: 'अनेकदा अश्लील फोटो पाठवले जातात'; चॅट शोमध्ये वरुणचा खुलासा

मुंबई : अभिनेता वरुण धवन बॉलिवूडमध्ये अगदी कमी वेळात प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. वरुण धवन सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. आपल्या सोशल मीडियावरून वरुण त्याच्या चित्रपटांबाबत, मित्रपरिवारासोबतचे, गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत अनेक पोस्ट शेअर असतो. नुकतंच वरुणने एका गोष्टीबाबत खुलासा केला आहे. वरुणने त्याला त्याच्या इनबॉक्समध्ये अश्लील फोटो पाठवले जात असल्याचं सांगितलं आहे. 

अभिनेता अरबाज खान याच्या 'पिंच' या चॅट शो दरम्यान अरबाजने वरुणला सोशल मीडियावर कोणती गोष्ट सर्वात जास्त दु:खी करते असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देताना वरुणने अनेकदा अनेकजण मला अश्लील फोटो पाठवतात. त्यावेळी अतिशय राग येतो. हीच गोष्ट सर्वात अधिक अपसेट करत असल्याचं त्याने म्हटलंय. 

'पिंच' चॅट शोमध्ये वरुणने त्याला अनेकदा अश्लील फोटो पाठवले जात असल्याचं सांगितलं. अरबाज खानने त्याच्या चॅट शोमध्ये वरुणला सोशल मीडियावर त्याच्याबाबत लिहिण्यात आलेले हेट मेसेजही वाचून दाखवले. वरुण याबाबत सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सहजासहजी देत होता. 'काही लोक ट्रोल करतात, काहींना मी आवडत नसलो तरी अनेक लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. मला अनेक वेळा चाहत्यांकडून चांगले, प्रेमळ संदेश येत असतात. त्यामुळे मी अशा नकारात्मक कमेंट करणाऱ्या लोकांकडे लक्ष देत नसल्याचं' त्याने सांगितलं. 

वरुण धवन लवकरच बहुचर्चित मल्टीस्टारर चित्रपट 'कलंक' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कलंक' चित्रपटात वरुण प्रमुख भूमिका साकारणार आहे. येत्या १७ एप्रिलला 'कलंक' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

'कलंक' की रिलीज से पहले वरुण धवन ने कही बड़ी बात, बोले- 'एक परीक्षा है लेकिन...'

या चित्रपटातून वरुण धवन आणि आलिया भट्ट ही जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. वरुण धवन, आलिया भट्टसह चित्रपटात माधुरी दिक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे.