बंद खोलीत 'त्या' दिवशी Varun Dhawan कोणासोबत होता...भावाने पाहिलं आणि...

वरुण धवनच्या खासगी आयुष्यातील ती रहस्यमय घटना... चर्चेला उधाण...   

Updated: Apr 24, 2022, 10:47 AM IST
बंद खोलीत 'त्या' दिवशी Varun Dhawan कोणासोबत होता...भावाने पाहिलं आणि... title=

मुंबई : 'स्टूडेंट ऑफ द ईयर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वरुण धवनच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अनेक तरुणींच्या मनातील ताईद असलेल्या वरूणने गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत गेल्या वर्षी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हिडीसो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. वरुण आणि नताशा कायम चाहत्यांना कपल्स गोल देत असतात. आज वरूणच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे. 

एक दिवस असा होता जेव्हा वरुणच्या भावाने त्याला एका मुलीसोबत बंद खोलीत पाहिलं होतं. एका कार्यक्रमात खुद्द वरुणने घडल्या प्रकाराबद्दल सांगितलं होतं.  वरुण एका मुलीसोबत एका बंद खोलीत होता.

तेव्हा वरुणचा मोठा भाऊ रोहित त्याठिकाणी आला, मोठ्या भावाला पाहिल्यानंतर वरुण घाबरला. जेव्हा  वरून खोलीतून बाहेर आला, तेव्हा रोहितने वरुणचं काहीचं ऐकलं नाही आणि त्याच्या कानशिलात लगावल्या. 

पण रहस्यमय गोष्ट म्हणजे वरुणने अद्याप बंद खोलीत असलेल्या मुलीबद्दल काहीही सांगितलं नाही. वरुणच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तो लवकरच अमर कौशिक दिग्दर्शित 'भेडिया'  या सिनेमात दिसणार आहे. 

याशिवाय कियारा अडवाणीसोबत 'जुग जुग जिओ'मध्ये देखील वरुण दिसणार आहे. 'रणभूमी', 'मिस्टर लेले', 'अरुण खेत्रपाल' बायोपिक आणि 'सनकी' सिनेमाच्या माध्यमातून वरुण चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.