वरूण धवनच्या ‘जुडवा २’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सलमान खानच्या गाजलेल्या ‘जुडवा’ या सिनेमाचा सिक्वल ‘जुडवा २’ची चर्चा जोरदार रंगली असताना या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. वरूण धवन यात डबलरोल साकारणार असून रोमान्स, कॉमेडी, अ‍ॅक्शन असा सगळा मसाला यात बघायला मिळणार असल्यचं ट्रेलरवरुन दिसतं. 

Updated: Aug 21, 2017, 04:29 PM IST
वरूण धवनच्या ‘जुडवा २’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज title=

मुंबई : सलमान खानच्या गाजलेल्या ‘जुडवा’ या सिनेमाचा सिक्वल ‘जुडवा २’ची चर्चा जोरदार रंगली असताना या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. वरूण धवन यात डबलरोल साकारणार असून रोमान्स, कॉमेडी, अ‍ॅक्शन असा सगळा मसाला यात बघायला मिळणार असल्यचं ट्रेलरवरुन दिसतं. 

वरूण धवन यात डबलरोल साकारत असून जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्याही मुख्य भूमिका आहेत. डेव्हिड धवन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून त्यांची कॉमेडीची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. साजिद नाडियाडवाला यांनी निर्मित केलेला हा सिनेमा येत्या २९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 

वरूण धवन हा प्रत्येक सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारत आहे. मात्र त्याचा दिलखुलास अंदाज प्रेक्षकांना अधिक भावतो. या सिनेमात तो तसाच दिसणार आहे. जुळ्या भावांच्या सिनेमात जसा मनोरंजनाला अधिक वाव असतो तसा यातही असेल यात शंका नाही. मात्र प्रेक्षकांना हा सिनेमा किती पसंत पडेल हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.