हा आहे बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता...

"सध्या तरी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता मी आहे," असे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याचे मत मांडले. नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या दमदार आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभिनयाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास माझ्या मते चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक मानधन मला मिळतं. मला मानधनासाठी विचारणा करावी लागत नाही. निर्माते स्वतःहून तेवढं मानधन मला देतात, असेही त्याने सांगितले.  

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 21, 2017, 03:47 PM IST
 हा आहे बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता...  title=

नवी दिल्ली : "सध्या तरी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता मी आहे," असे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने सांगितले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याचे मत मांडले. नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या दमदार आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभिनयाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास माझ्या मते चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक मानधन मला मिळतं. मला मानधनासाठी विचारणा करावी लागत नाही. निर्माते स्वतःहून तेवढं मानधन मला देतात, असेही त्याने सांगितले.  

 हॉलिवूडबद्दल बोलताना नवाजुद्दीन म्हणाला, " हॉलिवूडचा चित्रपट केला म्हणजे तुम्ही मोठे झालात, असा समज आपल्याकडे आहे. आपल्याला आपल्या चित्रपटांबद्दल अभिमान का वाटत नाही? आपल्यात न्यूनगंड का आहे हेच मला समजत नाही.  आपण अधिक प्रगत देशाचे चित्रपट पाहतो तेव्हा कुठेतरी आपण कमी पडतो ही भावना निर्माण होते. त्यांची पातळी आपण गाठू शकणार नाही असं आपल्याला वाटू लागतं. पण आपल्याला बॉलिवूड चित्रपटांबद्दल देखील अभिमान वाटला पाहिजे."