close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वरुण लवकरच बोहल्यावर, गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग

धवण आणि दलाल कुटुंब त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत.

Updated: May 22, 2019, 05:18 PM IST
वरुण लवकरच बोहल्यावर, गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अनेक सेलेब्रिटींनी आपली लग्नगाठ बांधल्या नंतर आता अभिनेता वरूण धवण बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोन, प्रियंका चोप्रा यांच्यानंतर आता वरूणच्या डोक्यावर अक्षदा पडणार आहेत. वरुण आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल हिच्यासोबत डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा मागिल बऱ्याच काळापासून रंगत होत्या. धवण आणि दलाल कुटुंब त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy diwali

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोव्यात या प्रेमी युगुलांचा लग्न सोहळा थाटात पार पडणार आहे. या वर्षाखेरीस हे दोघे त्याच्या नात्याला एक नवीन नाव देणार आहेत. 

त्याचप्रमाणे त्यांचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात करण्याचे वृत्त आहे. वरुण-नताशाच्या लग्न समारंभामध्ये त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक आणि सिनेविश्वातील अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत.