वासुदेव गायतोंडे यांच्या चित्राला तब्बल ४० कोटी रुपयांची बोली, अशी होतो चित्राचा लिलाव?

चित्रांची बोली अशी लागते....

Updated: Mar 17, 2021, 01:24 PM IST
वासुदेव गायतोंडे यांच्या चित्राला तब्बल ४० कोटी रुपयांची बोली, अशी होतो चित्राचा लिलाव?  title=

मुंबई : मराठमोळे भारतीय चित्रकार वासुदेव एस गायतोडे (Vasudeo Gaitonde)  यांची चित्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या चित्रांनी आतापर्यंत वेगवेगळे रेकॉर्ड रचले आहेत. असाच एक नवा रेकॉर्ड त्यांच्या चित्रांनी बनवला आहे. 1961 साली बनवलेलं त्यांचं एक निळ्या रंगाची ऑईल पेंटिंग्स तब्बल 39.98 कोटी (Vasudeo Gaitonde painting sets a new record in auction Canvas art sells 40 Crore ) रुपयांत विकलं गेलं आहे. 

 सॅफ्रनआर्ट स्प्रिंग लाईव्ह लिलावात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्राचा 11 मार्च रोजी रात्री उशिरा लिलाव झाला. या लिलावात चित्राची किंमत 39.93 कोटी म्हणजे 55 लाख अमेरिकन डॉलर्स एवढी होती. आतापर्यंत भारतीय कलाकाराच्या आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रांपैकी हे एक चित्र आहे. 

वासुदेव गायतोंडे यांनी या अगोदर स्वतःचेच विक्रम स्वतः मोडले आहेत. या अगोदरच असाच एक विक्रम त्यांनी 2020 मध्ये रचला आहे. 1974 साली तयार केलेलं एक ऑईल पेंटिंग 36 कोटी रुपयांना विकलं गेलं. महत्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे जगभरात आर्थिक संकंटांना सामोरं जावं लागत आहे. असं असताना वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांनी विक्रम रचला आहे. 

वासुदेव गायतोंडे हे ऍबस्ट्रॅक्ट चित्रकारांपैकी एक आहेत. गायतोंडे यांनी ऍबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणजे अमूर्त कलेला वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अगोदर 2015 साली लोकप्रिय संस्था क्रिस्टीने मुंबईत वासुदेव गायतोंडे यांच्या ऑईल पेंटिंगची बोली लागली. या चित्राने भारतीय कलेच्या जगात एक अनोखा विक्रम रचला आहे. त्या चित्र 30 करोड रुपये अशी बोली लागली होती.  

कोण आहेत वासुदेव गायतोंडे? 

अमूर्त शैलीत भारताचा ठसा उमटवणारे महान चित्रकार म्हणून वासुदेव गायतोंडे ओळखले जातात. वासदेव गायतोंडे हे भारतीय चित्रकलेत एक नवी चळवळ सुरू करणारे चित्रकार आहेत. गायतोंडे यांचा जन्म 1924 साली नागपूरमध्ये झाला. त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये कलेचं शिक्षण घेतलं. तसेच त्यांचं मुंबईतील गिरगावात वास्तव्य देखील होतं. गायतोंडे यांना न्यूयॉर्कच्या रॉकफेलर फाऊंडेशनची फेलोशिप मिळाली. 1971 साली गायतोंडे यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. 2001 साली दिल्लीत त्यांचं निधन झालं. 

चित्रांची किंमत कशी ठरते?

कुठल्या काळात चित्र काढलं आहे? 
कुठल्या माध्यमाचा वापर केला आहे? 
आधीच्या चित्रांना किती किंमत मिळाली? 
चित्राला किंवा चित्रकाराला ऐतिहासिक महत्व आहे का?