'या' कारणामुळे विणा जगतापने सोडलं अभिनय क्षेत्र? समोर आलं मोठं कारण

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली अभिनेत्री वीणा जगताप सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब आहे. मधल्या काळात ती आई माझी काळुबाई मालिकेत प्रमुख भूमिकेत होती पण प्रकृतीच्या कारणानं तिनं ती ही मालिका सोडली. 

Updated: Feb 19, 2023, 07:53 PM IST
'या' कारणामुळे विणा जगतापने सोडलं अभिनय क्षेत्र? समोर आलं मोठं कारण title=

मुंबई : शिव ठाकरे व वीणा जगतापचे 'बिग बॉस मराठी'च्या घरात सूर जुळले होते. त्यांची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतरही बराच वेळ ते रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, नंतर काही काळाने शिव व वीणा एकमेकांपासून वेगळे झाले. आजही अनेकदा शिव व वीणाबद्दलच्या नात्याबाबत माध्यमांमध्ये चर्चा होताना दिसतात. 

बिग बॉसनंतर वीणा फारशी कुठे दिसली नाही. मधल्या काळात ती आई माझी काळुबाई मालिकेत प्रमुख भूमिकेत होती पण प्रकृतीच्या कारणानं तिनं ती ही मालिका सोडली. त्यानंतर वीणा ठिपक्यांची रांगोळी मालिकेतही पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती.

याचबरोबर राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली अभिनेत्री वीणा जगताप सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब आहे. राधा प्रेम रंगी रंगली मालिकेनंतर वीणा बिग बॉस मराठी 2मध्ये दिसली. या शो दरम्यान तिचं नाव शिव ठाकरेबरोबर जोडलं गेलं. पण शिव आणि वीणाचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात होतं.  तसंच ते दोघं सिक्रेट रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं जातंय.

वीणा सध्या अभिनयापासून दूर गेली असली तरी ती सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. ज्यात ती प्रोफेशन मेकअपमध्ये दिसते. मात्र वीणानं तिच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. 'कोई हमारी तरह उम्र भर सफ़र में रहा', असं वीणानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

या पोस्टवरुन वीणा एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून तिची नवी इनिंग सुरू करत आहे असं दिसत आहे. या फोटोत वीणा एका मॉडेलचा मेकअप करताना दिसतेय. 'मी माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला आशा आहे की ते चांगलं होईल', असं वीणानं म्हटलं आहे. तिची ही पोस्ट तिने शेअर करताच सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. येवढंच नव्हेतर तिच्या या पोस्टवर तिचे चाहते. शुभेच्छांचा आणि कौतूकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.