वीरे दी वेडिंगच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

सुरुवातीला हा सिनेमा 18 मे ला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा सिनेमा जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 10, 2018, 05:58 PM IST
वीरे दी वेडिंगच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली title=

मुंबई : करीना कपूर खानचा बहुचर्चित सिनेमा वीरे दी वेडिंगच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सुरुवातीला हा सिनेमा 18 मे ला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा सिनेमा जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

तारीख पुढे ढकलण्याचं कारण

प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचं कारण ठरलाय एक हॉलिवूड सिनेमा. 18 मे ला रायन रेनॉल्ड स्टारर डेडपूल 2 हा हॉलिवू़डपट रिलीज होतोय. त्यामुळे वीरे दी वेंडिंगचे निर्माते कुठलीच रिस्क घ्यायला तयार नाही. त्यामुळे करीनाच्या चाहत्यांना आता जून महिन्यापर्यंत तिचं पडद्यावरचं रुप पाहायला वाट पाहावी लागणार आहे.