शरद केळकरला 'या' एका सवयीमुळे अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी फिल्मसाठी नाकारलं

नुकतीच शरद केळकरची 'द फॅमिली मॅन 2' ही वेबसिरिज प्रदर्शित झाली

Updated: Jul 5, 2021, 06:54 PM IST
शरद केळकरला 'या' एका सवयीमुळे अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी फिल्मसाठी नाकारलं title=

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावल्यानंतर शरद केळकर बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवत आहे. शरद केळकर बॉलिवूडमध्ये एक वर्सेटाइल अभिनेता म्हणून समोर आला आहे. नुकतीच शरद केळकरची 'द फॅमिली मॅन 2' ही वेबसिरिज प्रदर्शित झाली, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, अनेक वर्षानंतर शरदने आपल्या बालपणीची एक समस्या उघडकीस आणली, ज्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला. त्याने सांगितलं की, त्याच्या समस्येमुळे लोक त्याला चिडवत असत.

एका वृत्तानुसार शरद केळकर म्हणाला की, ''तुम्हाला माहित आहे, मला बोबड बोलण्याची समस्या होती. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला वाईट वागणूक दिली जात होती, परंतु आता माझ्याकडे पहा. मी आता ज्या क्षेत्रात आहे तिथे माझे इंटरव्हयू घेतले जातात.

अनेक नकारांचा सामना करावा लागला
आपल्या बोबड बोलण्याची समस्या एकदा शरदने एका मुलाखतीत नमूद केली होती. शरदने सांगितलं होतं की, त्याने आपल्या भितीदायक समस्येमुळे कधीही अभिनयाचा विचार केला नाही. शरद म्हणाला, मला खूपच नकारांना सामोरे जावं लागलं. मी हतबल व्हायचो, म्हणून अभिनय करणे माझ्यासाठी दूरची गोष्ट होती.

शरद पुढे म्हणाला, मी बराच बोबडा बोलायचो म्हणूनच मला नाकारलं जायचं, मात्र यामुळे मला अधिक सामर्थ्य प्राप्त झालं, ज्यामुळे मला चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्याची शक्ती मिळाली. मी बोबड बोलण्याच्या समस्येपासून मुक्त झालो. माझ्या बोबडेपणातून मुक्त होण्यासाठी मला दोन वर्षे लागली. नकार चांगला आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. हे आपल्याला आपल्या ध्येयांकडे कठोर परिश्रम करण्याची शक्ती देतं.

सध्या शरद त्याच्या बॅक टू बॅक रिलीजच्या सक्सेसचा आनंद घेत आहे. द फॅमिली मॅन 2 आधी शरद केळकरचा तानाजी आणि लक्ष्मी रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. मात्र, आता शरदचे चाहते द फॅमिली मॅनच्या तिसर्‍या सीझनच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत.