ज्येष्ठ अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे निधन

बंगाली सिने जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे निधन झालेय. त्या ७१ वर्षांच्या होत्या. एएनआयने ट्वविटरवरुन ही माहिती दिलीये.

Updated: Jul 9, 2017, 02:44 PM IST
ज्येष्ठ अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे निधन title=

नवी दिल्ली : बंगाली सिने जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे निधन झालेय. त्या ७१ वर्षांच्या होत्या. एएनआयने ट्वविटरवरुन ही माहिती दिलीये.

१९७१मध्ये आलेल्या 'आनंद' या  सिनेमात सुमिता यांनी अमिताभ बच्चन यांची प्रेयसी रेणू ही भूमिका साकारली होती. सुमिता यांचे खरे नाव मंजुळा संन्याल होते. त्यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९४५मध्ये दार्जिलिंगमध्ये झाला. 

सुमिता यांनी ४०हून अधिक बंगाली भाषेतील सिनेमे केले. तर हिंदीमध्ये त्यांनी गुड्डी, मेरे अपने, आशीर्वाद, कुहेली या सिनेमांमध्ये काम केले होते.