मुंबई : अभिनेत्री आणि युट्यूब असलेली उर्मिला निंबाळकर सध्या आपल्या आयुष्यातील खास क्षण अनुभवत आहे. उर्मिला लवकरच आपल्या बाळाला जन्म देणार आहे. उर्मिलाचं नवव्या महिन्यात डोहाळे जेवण झालं. या डोहाळे जेवणाचा सुंदर असा व्हिडीओ अपलोड केला.
प्रत्येक स्त्रीसाठी तिचा गर्भारपणातील काळ हा अतिशय खास असतो. उर्मिलाने या नऊ महिन्यांमधील प्रत्येक क्षण खऱ्या अर्थाने जगला आहे. तिने आपल्या अनेक व्हिडीओ लॉगमधून या नऊ महिन्यातील आनंद शेअर केला आहे. उर्मिलाने अगदी जवळच्या कुटुंबातील सदस्यांसोबत कोरोनाचे सर्व नियम सांभाळत हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला आहे. पुण्यातील 'ढेपे वाडा' मध्ये हा क्षण साजरा करण्यात आला आहे.
या व्हिडीओत आपण पाहू शकतो. उर्मिलाच्या हातावरील सुंदर मेहंदी. त्यानंतर तिचा त्या दिवसाचा संपूर्ण पोशाख हा अतिशय उत्कृष्ठ आहे. उर्मिलाला या कार्यक्रमात एखाद्या शूर पराक्रमी स्त्री सारखं राजेशाही थाटात मिरवायचं होतं. तिने तो क्षण तसा जगला. अनेकदा काही महिलांना गरोदरपणाचं किंवा त्या 9 महिन्यांचं थोडं टेन्शन असतं. मात्र उर्मिलाच्या या व्हिडीओंनी ती भीती दूर केल्याचं अनेक महिलांनी मान्य केलं आहे.
एका गर्भारपणातील स्रीची प्रतिमा, कमकुवत, परावलंबी, लाचार अशी का झालीय माहित नाही. मागच्या ९ महिन्यातील, तुम्ही दिलेल्या भरभरुन प्रतिसादावरुन, तुमच्या कमेंटस् मधून मी हा विचार बदलायला मदत करतीय, असं माझ्या लक्षात आलं. पण खरं सांगायचं तर, मी हे सगळं अजिबातच ठरवून नाही केलं. माझ्या पहिल्या pregnant असण्याच्या घोषणे पासून ते, ९ महिने भरपूर काम करेपर्यंत आणि आता चक्क हॅास्पिटलची बॅग भरेपर्यंत मला मी कधीच weak, helpless, बिचारी वाटले नाही. उलट मी या दिव्य परमेश्वरी व्यवस्थेच्या, माझ्या शरीराच्या, घरच्यांच्या, वेगवेगळ्या बदलांच्या प्रेमात पडत गेले. माझा डोहाळजेवणाचा लूक ठरवतानाही मला फक्त सुंदर, दिसायचं नव्हतं तर एखाद्या शूर पराक्रमी स्त्री सारखं राजेशाही थाटात मिरवायचं होतं. शरीरातील वेगवेगळ्या hormones च्या मदतीनं, अधिराज्य गाजवणारी राणी!
उर्मिलाला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. पण तिने त्या सगळ्यागोष्टी सकारात्मक पद्धतीने घेतल्या. तिच्या ट्रोलिंगचं आणि तिच्या पॉझिटिव्हीटीचं सोशल मीडियावर कायमच कौतुक होतं.