मुंबई : ज्येष्ठ गायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवारी रात्री उशिरा दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रुग्णालयाचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार Dr. Farokh E Udwadia आणि डॉ. प्रतित समधानी हे लतादीदींवर उपचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, लतादीदी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला समोर येत असलेल्या माहितीनुसार मंगेशकर कुटुंबीय रुग्णालयात त्यांच्यासोबत असल्याचं कळत आहे.
सविस्तर वृत्त लवकरच