कोणत्या अभिनेत्याबरोबर बिग बींची खासगी चर्चा ?

बच्चन कुटुंबासाठी इतकं महत्त्वाचं असं आहे तरी कोण? 

Updated: Nov 11, 2019, 04:11 PM IST
कोणत्या अभिनेत्याबरोबर बिग बींची खासगी चर्चा ?
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाविषयी कायमच प्रेक्षकांना कुतूहल पाहायला मिळालं आहे. सर्वसामन्यांप्रमाणेच बिग बी हेसुद्धा काही सेलिब्रिटींशी त्यांचे कौटुंबीक संबंध जपत असतात. अगदी विविध कार्यक्रमांमध्येसुद्धा कितीही व्यग्रस असले तरीही त्यांच्यासाठी कुटुंबाइतकेच महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधण्यास बिग बी अजिबात विसरत नाहीत. 

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की बच्चन कुटुंबासाठी इतकं महत्त्वाचं असं आहे तरी कोण? या प्रश्नाचं उत्तर खुद्द बिग बींनीच एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिलं आहे. अमिताभ यांच्यासाठी महत्त्वाची असणारी ती व्यक्ती म्हणजे किंग खान अर्थात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान. 

इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर करत त्यांनी हे नातं सर्वांपुढे ठेवलं. ज्यामध्ये ते दिवळीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका पार्टीमध्येही शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी  खान यांच्याशी काही खासगी गोष्टींवर चर्चा करताना दिसत आहेत. सेलिब्रिटींमध्ये आता नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे ठाऊक नाही, पण कामापलीकडे जाऊन त्यांच्यामध्ये असणारं हे नातं अनेकांना हेवा वाटेल असंच आहे. 

दरम्यान, बच्चन कुटुंबीयांकडून आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. पण, बिग बींनी शेअर केलेला हा फोटो अधिक खास ठरत आहे, असं म्हणायला हरकत नाही.