चोरून भेटतात बॉलिवूडमधील हे दोन कलाकार

'सैफीना' आणि 'विरुष्का' यांच्यानंतर  'विकॅट'  

Updated: Jan 23, 2020, 06:58 PM IST
चोरून भेटतात बॉलिवूडमधील हे दोन कलाकार

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली आहे. चाहते देखील त्यांच्या नात्याविषयी जाणून घेण्यास कायम उत्सुक असतात. त्यांना अनेक ठिकाणी एकमेकांसोबत स्पॉट करण्यात आले आहे. त्यामुळे ते डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 

दरम्यान, मित्राच्या घरी पार्टीसाठी गेलेल्या विकी आणि कॅटरिनाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ही पार्टी अली अब्बाज जफरच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये अनेक कलाकार उपस्थित होते. पण सगळ्यांच्या नजरा विकी-कतरिनावर खिळल्या होत्या. 

सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होताच काही युजर्सने 'Cute Couple' अशी प्रतिक्रीया  दिली तर काहींनी 'सैफीना' आणि 'विरुष्का' यांच्याप्रमाणे आता दोघांना 'विकॅट' असं नाव दिलं आहे. सध्या विकी आणि कतरिनाची नवखी जोडी चांगलीच चर्चेत आहे. 

याआधी दोघेही उद्योगपती अंबानींच्या दिवाळी पार्टीमध्ये देखील एकत्र झळकले होते. आता पुन्हा कतरिना आणि विकीला एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. त्यांची काही फोटो देखील कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. 

तर, करण जोहरच्या शोमध्ये कतरिनाने विकीसोबत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आतापर्यंत विकी-कतरिनाने कधीही एकत्र स्क्रिन शेअर केलेली नाही. पण आता रंगत असलेल्या चर्चांवरून असे स्पष्ट होते की ते दोघे एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस नक्की येतील.