लग्नाआधीच विकी कौशलचा सारा अली खानसोबतचा व्हॅनिटीमधला 'तो' व्हिडिओ लीक

शेवटी सारा आणि विकी दोघेही 

Updated: Nov 30, 2021, 02:03 PM IST
  लग्नाआधीच विकी कौशलचा सारा अली खानसोबतचा व्हॅनिटीमधला 'तो' व्हिडिओ लीक  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'अतरंगी रे' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती धनुष आणि अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील 'चकाचक' हे गाणे रिलीज झाले असून ते रसिकांच्या पसंतीस उतरले आहे.

पण हे गाणे रिलीज होण्यापूर्वी सारा अली खान अभिनेता विकी कौशलसोबत दिसली, जो कतरिनासोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आला होता. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्न करणार असल्याचा दावा केला जात आहे.

सारा अली खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती विकी कौशलसोबत नॉक-नॉक गेम खेळताना दिसत आहे. मात्र, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये चाहते कतरिना कैफबद्दल बोलताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडिओमध्ये सारा अली खान नॉक नॉक म्हणताना दिसत आहे. यावर विकी म्हणतो, 'कोण आले?' यावर विकी उत्तर देतो, 'चकाचक, उद्या कोण येतोय.' यानंतर दोघेही गाणे सुरू करतात. त्याच वेळी, शेवटी सारा आणि विकी दोघेही हसायला लागतात. सारा आणि विकीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सारा अली खानने लिहिले आहे, 'नॉक सारा, रॉक विकी.' अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये सारा आणि विकीचे नाव एकत्र लिहिले आहे. पण एका यूजरने विकी कौशलला कतरिना कैफकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. युजरने लिहिले, 'भाऊ कतरिनाकडे जा, सारासोबत तू इथे काय करत आहेस?'