Confirmed! विक्की कौशल-कॅटरिना कैफ या दिवशी अडकणार विवाहबंधनात, कलेक्टर ऑफीसचं पत्र आलं समोर

कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या विवाहदरम्यान नियंत्रण, कायदा सुव्यवस्था आणि इतर परिस्थिती हाताळण्यासाठी कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. 

Updated: Dec 2, 2021, 11:37 PM IST
Confirmed! विक्की कौशल-कॅटरिना कैफ या दिवशी अडकणार विवाहबंधनात, कलेक्टर ऑफीसचं पत्र आलं समोर

मुंबई : बॉलिवुड इंडस्ट्रीतील 2 मोठे स्टार विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हे सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. दोघांचं लग्न कधी होणार याबाबत अनेकांना उत्सूकता असतानाच आता दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. दोघेही 9 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. 

विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ यांचा विवाहासाठी (Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding) राजस्थानच्या जिल्हा सवाई माधोपूर कलेक्टर ऑफिसने एक पत्र जारी केले आहे. 9 डिसेंबरला हे दोघे विवाह करणार आहेत. तर 3 डिसेंबर रोजी दोघांचं कोर्ट मॅरेज (Katrina Kaif And Vicky Kaushal Court Marriage) होणार आहे. स्‍पेशल मॅरेज अँक्‍ट, 1954 नुसार दोघेही आधी रजिस्‍टर्ड करणार आहेत.

कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या विवाहदरम्यान नियंत्रण, कायदा सुव्यवस्था आणि इतर परिस्थिती हाताळण्यासाठी कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. ज्यामध्ये मोठे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या विवाहाला पीएमओ मधूनही 5 अधिकारी येणार आहेत. त्यासाठी पीएमओ द्वारे कलेक्टर ऑफिसकडे रूट चार्ट मागवण्यात आलाय. तसेच 100 बाउंसर या विवाहाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत.