जॅकलीनच्या मदतीसाठी सलमान येणार पुढे

अलीकडेच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत होती. 

Updated: Dec 2, 2021, 08:03 PM IST
जॅकलीनच्या मदतीसाठी सलमान येणार पुढे

मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिचे २०० कोटींच्या फसवणुकीचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेकरसोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले होते. आतापर्यंत व्हायरल झालेल्या दोन फोटोंमध्ये दोघंही आरशासमोर फोटो काढताना दिसत आहेत. 

यातील एकामध्ये सुकेश जॅकलीनच्या गालावर किस करताना दिसत आहे. तर दुसऱ्यामध्ये जॅकलीन सुकेशच्या गालावर किस करत आहे. दोन्ही फोटो समोर आल्यानंतर चाहते खूप नाराज झाले होते आणि काही लोकांनी जॅकलीनला मनी लाँड्रिंग प्रकरणाचा एक भाग असल्याचंही सांगितलं होतं.

आत्तापर्यंत जॅकलीन आणि बहुतेक सेलिब्रिटी या प्रकरणावर पूर्णपणे मौन बाळगून आहेत. आता हळूहळू जॅकलिनला या प्रकरणी इंडस्ट्रीकडून पाठिंबा मिळणार असल्याच्या बातम्या येत आहेत. यामध्ये पहिलं नाव समोर येत आहे. 

दबंग स्टार सलमान खानचं. या संपूर्ण प्रकरणात जॅकलिन तिचा गुरू सलमान खानचा आधार घेणार असल्याच्या बातम्या आहेत. याबाबत ती लवकरच सलमान खानला भेटू शकते. सुकेश चंद्रशेखरवर रॅनबॅक्सीच्या प्रमोटरला जेलच्या बाहेर आणण्यासाठी त्याच्या पत्नीला 200 करोड़ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप  लावला होता.  

या प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीची तपास यंत्रणा ईडीने चौकशी केली होती. जॅकलीनशी मैत्री करताना सुकेशने स्वत:ला मोठा बिझनेसमन असल्याचं सांगितलं होतं.  सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या आणि त्यामुळे ईडीने अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीदरम्यान जॅकलिनने सांगितलं होतं की, ती सुकेशला डेट करत नाहीये.