Video : 'माणुसकीचा फ्रिज' भरलेला ठेवण्यासाठी संजय मोने प्रयत्नशील

पाहा, नितीन सरदेसाई यांची ही अनोखी संकल्पना   

Updated: Nov 11, 2020, 08:13 AM IST
Video : 'माणुसकीचा फ्रिज' भरलेला ठेवण्यासाठी संजय मोने प्रयत्नशील  title=

मुंबई : कोरोना व्हायरस coronavirusमुळं साऱ्या जगभरात चिंतेची लाट पसरली. परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी म्हणून अनेक ठिकाणी टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. खेडेगाव, शहरं आणि अखंड देशच लॉकडाऊनचे नियम पाळू लागले. भारत, महाराष्ट्र आणि ही मुंबईसुद्धा याला अपवाद ठरली नाही. 

कोरोनावर ताबा मिळवण्यासाठी ही पावलं उचलली गेली. पण, यामध्ये अनेक गरजुंना मात्र जगणंही कठीण झालं. अनेकांच्या अन्नपाण्याची आणि निवाऱ्याचीही आबाळ झाली. सध्या हे चित्र बदलत आहे. अनेक नियमही शिथील करण्यात आले आहेत. पण, असं असतानाही समाजातील एक वर्ग असाही आहे, ज्याला या परिस्थितीतून सावरण्यासाठी आणखी बराच वेळ लागणार आहे. अशाच गरजूंसाठी आपल्या परिनं मदतीचा हात पुढे करता यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते नितीन सरदेसाई यांनी एक संकल्पना अंमलात आणली आहे. 

सरदेसाई यांना यामध्ये साथ लाभली आहे ती म्हणजे अभिनेते संजय मोने यांची. सोशल मीडियावर खुद्द सरदेसाई यांनीच यासंदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट करत त्याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये संजय मोने हे एका मोठ्या फ्रिजमघ्ये काही पदार्थ ठेवताना दिसत आहेत. 'कम्युनिटी फ्रिज' अशी ही आगळीवेगळी संकल्पना. ज्याअंतर्गत गरजूंना त्यांची भूक भागवता येणार आहे. याच संकल्पनेबाबत ते इथं माहितीही देताना दिसत आहेत. 

सध्याच्या घडीला मुंबईतील माहिम शीतलादेवी परिसरात हे पाऊल उचललं गेलं आहे. गरजवंतांची मदत करण्यासाठी येत्या काळात इतरही अनेक भागांमध्ये अशा प्रकारच्या संकल्पनांच्या सहाय्यानं मदतीचा हात पुढे केला जावा असं आवाहनही करण्यात येत आहे.