मुंबई : भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांनी काही दिवसांपूर्वीच पत्नीच्या जोडीनं आपल्या होणाऱ्या सुनेसाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अनंत अंबानी याची होणारी पत्नी आणि अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंट हिचा 'अरंगेत्रम' कार्यक्रम नुकताच पार पडला. (Video nita ambani shares a special bond with to be daughter in law radhika Arangetram Ceremony)
अंबानी कुटुंबापासून इतरही क्षेत्रातील बऱ्याच दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी राधिकानं तिची भरतनाट्यम ही नृत्यकला सर्वांसमोर सादर केली.
राधिकाचं हे कौशल्य पाहताना सर्वजण भारावले. खुद्द नीता अंबानी यांनीही मोठ्या कौतुकाने राधिकाला शाबासकी दिली. तिची प्रशंसा करताना त्यांनी घट्ट मिठी मारली आणि कपाळावर मुका घेत तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त केलं.
राधिकाचं कौतुक करताना नीता अंबानी यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद अगदी स्पष्टपणे पाहता येत होता. राधिकाही त्यांच्या या शब्दांनी काहीशी भावूक झाली.
नीता अंबानी आणि राधिकाचं हे नातं पाहता, प्रत्येक सासू- सुनेचं नातंही असंच असावं हेच तुम्हालाही वाटू शकतं. एक व्यक्ती म्हणून आपली सून तिच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करत असताना तिच्या आत्मविश्वासाला आपल्या पाठिंब्याची जोड देण्याचा प्रत्येक सासूनं प्रयत्न करावा, नाही का?
काय आहे अरंगेत्रम?
अरंगेत्रम सादर करण्याचा क्षण राधिका आणि तिच्या गुरू भावना ठाकर यांच्यासाठी अत्यंत मोलाचा होता. मागील 8 वर्षांपासून त्यांनी राधिकाला या दिवसासाठी तयार केलं होतं. अरंगेत्रम, हा तोच क्षण असतो जेव्हा कोणीही शास्त्रीय नृत्य नर्तक किंवा नर्तिका पहिल्यांदाच व्यासपीठावर नृत्य सादर करतात.
अरंगेत्रम, हे शास्त्रीय नृत्य रंगमंचावर सादर करण्याचं आणि दुसऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी स्नातक असण्याचं प्रतीक असतं.