'हृद्यात वाजे समथिंग'.... सामंथासाठी सलमानच्या हृदयाचे ठोके वाढले

 बॉलिवूडचा दबंग खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Updated: Jun 27, 2022, 06:05 PM IST
'हृद्यात वाजे समथिंग'.... सामंथासाठी सलमानच्या हृदयाचे ठोके वाढले  title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेता सध्या हैद्राबादमध्ये 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, सलमानला बऱ्याच काळापासून साऊथचे  स्टार्स आणि सिनेमे पाहणं आवडतं आणि तो पाहून हे प्रभावित होतो. याचा पुरावा म्हणजे नुकताच व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ. काही काळापूर्वी सलमान एका अवॉर्ड फंक्शनला गेला होता. जिथे त्याने ही गोष्ट व्यक्त केली होती.

अलीकडेच अवॉर्ड फंक्शनदरम्यान सलमानला त्याच्या आवडत्या गाण्याबद्दल त्याला विचारण्यात आलं तेव्हा त्याने पुष्पा या सुपरहिट चित्रपटातील एका गाण्याचा उल्लेख केला. सलमान खानलाही पुष्पा चित्रपटातील हे गाणं पसंत आहे. जे सध्या सर्वांच्याच जिभेवर आहे.

खरंतर, जेव्हा सलमान खानला मागच्या वर्षीच्या अशा कोणत्याही चित्रपटाबद्दल किंवा सलमान खानला प्रेरित किंवा आवडलेल्या गाण्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा सलमान हसला आणि गाणं गुणगुणू लागला. सलमानने पुष्पा चित्रपटातील 'ऊ अंतवा' हे गाणं त्याच्याच शैलीत गुणगुणलं.

या गाण्यात अल्लू अर्जुन आणि समंथा रुथ प्रभू दिसले होते. याशिवाय, कभी ईद कभी दिवालीच्या शूटिंगच्या निमित्ताने हैद्राबादमध्ये पोहोचलेल्या सलमान खानला स्टार राम चरणने त्याच्या घरी डिनरसाठी आमंत्रित केलं होतं. सध्या सलमान खानचे रामचरणसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या डिनर पार्टीमध्ये अभिनेत्री पूजा हेगडेही रामचरणच्या घरी उपस्थित होती. या दरम्यान सर्वांनी एकत्र चांगला वेळ घालवला.