VIDEO : सनी लिओनीला 'नवरोबा'ची भुरळ; पाहा अभिनेत्रीचा मराठी गाण्यावरील डान्स

'कन्नी' या चित्रपटाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी अनेकांना वेड लावले आहे. सनीला सुद्धा या चित्रपटातील गाण्याचं वेड लागलं आहे.

Updated: Mar 7, 2024, 01:46 PM IST
VIDEO : सनी लिओनीला 'नवरोबा'ची भुरळ; पाहा अभिनेत्रीचा मराठी गाण्यावरील डान्स  title=

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी ही बॉलिवूडची सगळ्यात बोल्ड अभिनेत्रीपैकी एक आहे. अभिनेत्रीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्रीने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल व्हायला काही मिनीटं लागतात. नुकताच सनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सनीने सोशल मीडियावर एक डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये सनी मराठी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. कन्नी सिनेमातील 'नवरोबा' या गाण्यावर सनी थिरकली आहे. सनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

'कन्नी' या चित्रपटाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी अनेकांना वेड लावले आहे. प्रत्येक गाण्याचा जॉनर वेगळा असून सगळ्याच गाण्यांवर संगीतप्रेमी प्रेम करत आहेत. यातील विशेष गाजलेले गाणे म्हणजे 'नवरोबा'. या गाण्यावरील अनेक रील्स सध्या व्हायरल होत आहेत. यातील हूकस्टेपही प्रचंड गाजत आहे आणि याचीच भुरळ बॉलिवूडच्या सनी लिओनीला पडली आहे. 'नवरोबा' गाण्यावरील सनीचे हे नृत्य सोशल मीडियावर प्रचंड गाजतेय. सनी हे गाणे एन्जॉय करतेय,असे एकंदर तिच्या चेहऱ्यावरून दिसतेय. 

दरम्यान,  समीर जोशी लिखित, दिग्दर्शित ‘कन्नी’ चित्रपट येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ऋता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.  या चित्रपटाची निर्मिती अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी यांनी केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सनीचा हा क्यूट व्हिडीओ तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. सनीचा हा व्हिडीओ अवघ्या काही वेळातच व्हायरल होतोय. काही वेळातच या व्हिडीओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स होताना पाहायला मिळत आहेत. चाहत्यांना सनीचा डान्स आणइ तिचा अंदाज चांगलाच आवडल्याचं दिसत आहे. सनीचा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचं कौतूक केलं आहे. चाहते सनीच्या डान्सचे आणि तिच्या स्टाइलचं खूप कौतुक करत आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिले आहे की, या व्हिडिओ त्यांचा दिवस गोड केला.