EXCLUSIVE : प्रियांका-निकचा यंदाच्या वर्षात हनीमूनचा प्लान नाही तर...

लग्नानंतर सर्वप्रथम 'झी मीडिया'शी प्रियंकाने एक्सक्लुझीव्ह बातचीत केली

Updated: Dec 6, 2018, 10:05 AM IST
EXCLUSIVE : प्रियांका-निकचा यंदाच्या वर्षात हनीमूनचा प्लान नाही तर...

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा परदेशी नवरा - अमेरिकन गायक निक जोनास यांचा विवाहसोहळा आता संपन्न झालाय... त्यामुळे, हातातील कामं बाजुला सारून हे नवविवाहीत जोडपं हनीमूनला जाणार असा तुमचा कयास असेल तर तुम्ही चुकीचे ठरू शकता... विवाहानंतरही आपल्या कुटुंबासोबत प्रियांकाचा आपल्या कामाला असलेला प्राधान्यक्रम कायम आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रियांका एका नव्या प्रोजेक्टसाठी बाहेर पडलीय... आणि निकही प्रियांकाची ही धावपळ समजून तिला यासाठी मदत करतोय. 

आधी हातातले प्रोजेक्ट पूर्ण करणार आणि मगच हनीमूला जाणार असं ही देसी गर्ल म्हणतेय... लग्नानंतर सर्वप्रथम 'झी मीडिया'शी प्रियंकाने एक्सक्लुझीव्ह बातचीत केली. यावेळी तिनं हा खुलासा केलाय. 

विवाहबद्ध होण्याच्या निर्णयाआधीच एका कंपनीबरोबर काम करण्यासाठी आपण करार केला होता... त्यासाठी मी डिसेंबर महिन्यात भारतात येणार होते... पण मी लग्नाचा निर्णय घेतला... त्यामध्ये कंपनीची काही चूक नाही... निक आणि माझ्यासाठी आमची कामं खूप महत्त्वाची आहेत... आणि आम्हाला एकमेकांच्या प्राधान्याची जाणीव आहे... ती आम्ही समजून घेऊ शकतो... त्यामुळे हनीमूनला आम्ही पुढच्या वर्षीही जाऊ शकतो... असं स्पष्टीकरणही प्रियांकानं दिलंय.

अमेरिकन गायक निक जोनास याला डेट केल्यानंतर अखेर प्रियांकाने त्याच्याशी १ आणि २ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. जोधपूर येथील उमेदभवन पॅलेसमध्ये मोठ्या थाटात हे जोडपं विवाहबद्ध झालं. ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतींनी निक-प्रियांका विवाहबद्ध झाले होते.