VIDEO : नववधू नेहा कक्करचं सासरी दणक्यात स्वागत

पाहा रोहनप्रीत सिंगच्या कुटुंबीयांनी कसं केलं आपल्या सुनेचं स्वागत....   

Updated: Oct 27, 2020, 03:22 PM IST
VIDEO : नववधू नेहा कक्करचं सासरी दणक्यात स्वागत
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दिल्लीमध्ये पार पडलेल्या दिमाखदार विवाहसोहळ्यानंतर गायिका नेहा कक्कर आता पोहोचली आहे ती म्हणजे तिच्या सासरच्या घरी. अस्सल पंजाबी पद्धतीनं ढोलाच्या ठेक्यावर सासरच्या मंडळींनी नेहाचं स्वागत केलं. रोहनप्रीत सिंग याच्यासह विवाहबंधनात अडकल्यानंतर नेहा कक्कर Neha Kakkar हिनं आता जीवनातील एका महत्त्वाच्या टप्प्यात पाऊल ठेवलं आहे. याची सुरुवात खऱ्या अर्थानं दणक्यात झाली आहे, हे सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ अगदी स्पष्टपणे सांगत आहेत. 

कुटुंबाच्या मुळ घरी स्वागत होत असताना ढोल वाजू लागताच खुद्द नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत हे दोघंसुद्धा आनंदात ठेका धरताना एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर, नेहा आणि रोहनप्रीतसाठई घरातल्या मंडळींनी केकचीही व्यवस्था केली होती. यावेळी उपस्थितांचा उत्साह पाहण्याजोगा होता. लग्नघरी असणारं वातावरण इथं पाहायला मिळालं. 

 
 
 
 

A post shared by Ne- (@neheart_zaina) on

 
 
 
 

A post shared by Classy Brides  (@desiclassybrides) on

 
 
 
 

A post shared by Risk Hai To Ishq Hai (@riskhaitoishqhai) on

 

लग्नघर म्हटलं की अनेक विधी आणि त्या ओघानं येणारे काही खेळही आलेच. अशाच एका परंपरागत खेळामध्ये नेहा आणि रोहनप्रीत दुधानं भरलेल्या एका पात्रात अंगठी शोधतानाही दिसले. यात नेहानंच बाजी मारत अंगठी शोधली आणि त्यावेळी तिचा आऩंद गगनात मावेनासा झाला होता. अशा पद्धतीनं ही नवविवाहित जोडी त्यांच्या जीवनातील काही अविस्मरणीय दिवसांचा मनमुराद आनंद लुटत आहे. मुख्य म्हणजे अनेक फॅन पेजवर पोस्ट करण्यात आलेले व्हिडिओ आणि फोटो यांमुळं चाहत्यांनाही या खास क्षणांचं साक्षीदार होता येत आहे.