Vidy Baalanचा बाथटबमधील अजब लूक Viral, पाहा Video

या व्हिडीओमध्ये ती बाथटबमध्ये रागाने 'आपको क्या' या शब्दात राग व्यक्त करताना दिसतं आहे.

Updated: Sep 1, 2022, 03:14 PM IST
 Vidy Baalanचा बाथटबमधील अजब लूक Viral, पाहा Video title=
Vidy Baalan strange look in the bathtub goes viral on social media

Vidy Baalan: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidy Baalan)चा बाथटबमधील अवतार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बाथटबमध्ये रागाने 'आपको क्या' या शब्दात राग व्यक्त करताना दिसतं आहे. त्या तुम्ही म्हणाल की विद्या बालनला नेमकं काय झालं आहे आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो, विद्या बालनने 'अनुपमा' मधील प्रसिद्ध सीन 'आपको क्या' चे स्वतःचे व्हर्जन शेअर केलं आहे. रुपाली गांगुली या शोमध्ये मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेत तिचा 'आपको क्या' लाइन सोशल मीडियावर खूप पसंत केली जातं आहे.

विद्या बालन सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. त्यामुळे 'आपको क्या' हा सोशल मीडियावरील ट्रेंड ओळखला आणि एक स्वत:चा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला. विद्या बालन बाथटबमध्ये बसून तिच्या शैलीत 'अनुपमा'ची ओळ बोलताना दिसत आहे. त्याचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Vidy Baalan strange look in the bathtub goes viral on social media)

आपको क्या...

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, विद्या बालन बाथरोब घालून रिकाम्या बाथटबमध्ये बसलेली दिसत आहे. ती 'अनुपमा'च्या डायलॉग्सवर लिप सिंक करत आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, 'मी हिंडू-फिरू, नाचू-गाऊ, हसू-खेळू, बाहेर जाऊ, एकटी जाऊ, कोणासोबत जाते, मी कुठेही जाते, कधी जाते, कशी जाते... आपको क्या'. हा व्हिडिओ तिने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये 'बोलो बोलो' असं लिहिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

विद्या बालनचा हा मजेदार व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. एका चाहत्याने कंमेट केलं आहे की, 'माझ्या आवडत्यापैकी एक माझ्या दुसऱ्या आवडत्या डायलॉगवर परफॉर्म करत आहे.'