मुंबई : बॉलिवूड कलाकार कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यापैकी एक म्हणजे विद्या बालन. अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विद्या सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नेहमीच अभिनेत्री स्वत:चे कॉमेडी रिल्स शेअर करुन तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. मात्र नुकतीच अभिनेत्रीबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री विद्या बालनच्या नावाचं एक फेक अकांउन्ट बनवलं गेलं आहे. इतकंच नाही तर त्या फेक अकाउंन्टवरुन एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीतील लोकांकडून पैसेही मागितले जात आहेत. याच प्रकरणात विद्याने या अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुंबई पोलिंसात FIR दाखल केली आहे.
विद्या बालनने दाखल केली FIR
ANI च्या रिपोर्टनुसार विद्या बालनने मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. एका अनोळखी व्यक्तीने विद्या बालनच्या नावे इन्स्टाग्रामवर अकाउन्ट तयार केलं आणि यानंतर या अकांउन्टवरुन त्या व्यक्तीने पैशांची मागणी सुरु केली. आपण तुम्हाला काम देतो त्याबदल्यात त्या वक्तीने पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. खार पोलिसांनी या प्रकरणात सेक्शन 66 (C) IT अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
कामाच्या बदल्यात केली पैशांची डिमांड
समोर आलेल्या वृत्तानुसार, विद्या बालनच्या नावाने ती अज्ञात व्यक्ती इन्स्टाग्राम आयडी आणि जीमेल अकाउन्ट तयार करुन एन्टरटेन्मेंटच्या व्यक्तिंशी जोडलेल्या लोकांसोबत कॉन्टक करायचा आणि नोकरीचं आश्वासन देवून त्यांच्याकडून पैशांची मागणी करयाचा आणि जेव्हा या सगळ्या प्रकारणाबद्दल विद्या बालनला समजलं तेव्हा तिने लगेच या प्रकरणावर पाऊल उचल्यास सुरुवात केली आणि पोलिसांत त्या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली. आम्ही तुम्हाला सांगतो की, विद्या बालनआधी महेश बाबूची मुलगी सितारा घट्टमेननीचं देखील फेक अकाउन्ट बनवलं गेलं. ज्याबद्दल स्वत: महेश बाबू आणि त्यांची पत्नी नम्रता शिरोडकरने दिली.
अभिनेत्री विद्या बालन अशा एका अभिनेत्रीपैकी एक आहे जिची सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चा होते. सोशल मीडियावर विद्या बालनचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीच्या पर्सनल आयुष्यात काय चाललंय जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना कायमच आवडतं.