''Lust at First Sight...'' पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबतच्या रिलेशनशिपवर काय म्हणाली विद्या बालन?

Vidya Balan Says Lust at First Sight: अभिनेत्री विद्या बालन ही आपल्या हटके लुकसाठी आणि अभिनयासाठी कायमच ओळखली जाते. सध्या तिनं आपल्या आणि पती सिद्धार्थ रॉय कपूरच्या नात्यावरती भाष्य केले आहे. यावेळी तिनं नक्की काय म्हटलंय जाणून घेऊया. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 6, 2023, 07:43 PM IST
 ''Lust at First Sight...'' पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबतच्या रिलेशनशिपवर काय म्हणाली विद्या बालन?  title=
July 6, 2023 | vidya balan says it was lust at first sight with husband siddharth roy kapoor

Vidya Balan Says Lust at First Sight: विद्या बालन ही सध्या आघाडीची अभिनेत्री आहे. सध्या तिच्या 'नियत' या वेबसिरिजची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या वेबसिरिजमधून तगडी स्टारकास्ट दिसते आहे. परंतु सध्या अभिनेत्री विद्या बालन आपल्या वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आली आहे. सिद्धार्थ रॉय कपूर याच्यासोबत विद्या बालननं लग्नगाठ बांधली आहे. एका मुलाखतीतून तिनं आपल्या आणि सिद्धार्थ रॉय कपूरच्या नात्यावर भाष्य केले आहे. आपल्या पहिल्याच भेटीत आपण एकमेकांकडे लव्ह एट फर्स्ट साईटनं नाही तर लस्ट एट फर्स्ट साईटनं आकर्षित झालो असं तिनं सांगितलं आहे. नेमकं तिनं यावेळी आपल्या मुलाखतीतून काय सांगितले आहे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. विद्या बालनच्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सध्या विद्या बालन ही तिच्या 'नियत' या वेबशोला प्रमोट करण्यात खूप व्यस्त आहे. 

या प्रमोशनदरम्यान तिनं रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टला एक मुलाखत दिली होती. यावेळी तिनं आपल्या आणि सिद्धार्थ रॉय कपूरच्या रिलेशनशिपवर भाष्य केले आहे.  सोबतच तिनं सांगितले की तिला पहिल्याच भेटीत लग्न करायचे नव्हते. ती म्हणाली की, ''मला खरंतर अजिबातच लग्न करायचे नव्हते. मी हे फारच प्रमाणिकपणे सांगते की मला स्वत:ला कुणाशी लग्न करायचे नव्हते आणि मी स्वत:ला त्याप्रकारची कोणी व्यक्ती मानतच नाही की जी लग्न करण्यास उत्सुक असेल. मला कोणसोबत तरी राहायचे होते परंतु मला कधीही त्या व्यक्तीशी लग्न करण्यात रस नव्हता. मी एका वयानंतर म्हणजे जेव्हा मी परिणीता हा चित्रपट केला तेव्हा मी 26 वर्षांची होते, तेव्हापासून मी 30 वर्षांची होईपर्यंत मला खूप यश प्राप्त झाले होते. जे मला कोणाबरोबर तरी शेअर करायचे होते.'' 

आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलतना ती मला म्हणाली की, ''मी माझ्या आयुष्यात काही लोकांना डेट केले परंतु त्या रिलेशनशिप्स तितक्या चांगल्याप्रकारे टीकू शकल्या नाही. मला फार एकटं वाटतं होतं. परंतु तुम्हाला तुमच्या आयुष्यात असं कोणीतरी हवंच असतं ज्याच्याशी आपण सर्वकाही शेअर करू शकू. त्या लोकांना मी डेट केलं. परंतु त्या रिलेशनशिपचे पुढे काहीच झाले नाही. परंतु या सर्व रिलेशनशिप्सना मी विसरून जाण्याचा प्रयत्न केला'', असं ती पुढे म्हणाली. 

हेही वाचा - 'बाईपण भारी देवा'तील 'मंगळागौर' गाणं लिहिलंय 'या' अभिनेत्रीनं, क्रिकेटर राहूल द्रविडशी आहे खास नातं

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिद्धार्थ रॉय कपूरच्या नात्याविषयी काय म्हणाली विद्या बालन? 

विद्या बालन म्हणाली की, मी सिद्धार्थकडे जेव्हा माझी पावलं वळवली तेव्हा मात्र मला खात्री वाटली. मला त्याच्याबद्दल अनेक गोष्टी वाटू लागल्या त्यातून अनेक संवेदनशील गोष्टीही मला वाटू लागल्या होत्या. तिला त्याच्याबद्दल प्रथम वासनेची भावना निर्माण झाली होती असं ती यावेळी म्हणाली.