मुंबई : 'डर्टी पिक्चर', 'शकुंतला देवी', 'कहानी' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री विद्या बालनने आपल्या अभिनयाने सर्वांची मन जिंकली आहेत. विद्याचा अंदाच प्रत्येकवेळी नवीन असतो. ती प्रत्येकवेळी काहीतरी नवनवीन करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तिचं खूप कौतुकही केलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का? विद्या बालनने तिच्या कारकिर्दीची सुरूवात एका टीव्ही मालिकेतून केली होती. 1995चा हा शो सुपरहिट होता. लोकांना अजूनही हा शो खूप आवडतो.
विद्या बालनने वयाच्या १६व्या वर्षी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात टीव्ही मालिका 'हम पांच' या मालिकेतून केली. हा शो एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांनी तयार केला होता. या शोने बरीच लोकप्रियता मिळविली. या शोमधून विद्याने करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली.
ही होती 'हम पांच'ची कहाणी
या मालिकेत मध्यमवर्गीय माणसाची कहाणी दाखविण्यात आली होती. आनंद माथूर असं त्याचं नाव आहे. तो एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करतो आणि त्याला पाच मुली आहेत. आनंदच्या तीन मुली पहिल्या पत्नीच्या असून दोन मुली दुसरी पत्नी बीना यांच्या आहेत. पहिल्या पत्नीचं निधन होतं पण एका फोटोद्वारे ती पती आनंदशी कायंम बोलते असते.
आनंद माथूरच्या पाच मुलींची कॅरेक्टर वेग वेगळी दाखविली आहेत. एक कुणी गुंडांशी भांडण करत तर दुसरीला शाहरुख खानशी लग्न करायचं असतं. प्रत्येक भागात त्याच्या मुली आनंद माथुरसाठी एक नवीन प्रोब्लेम घेवून येत असतात. विद्या बालनने आनंद माथुरची दुसरी मुलगी राधिकाची भूमिका साकारली. यापूर्वी हे पात्र अमिता नांगियाने साकारले होतं, नंतर तिची जागा विद्या बालनने घेतली.
विद्या बालन लांब केसांमध्ये मोठा चष्मा परिधान करताना दिसली होती. जेव्हा विद्याने ही भूमिका साकारली, तेव्हा तिचं वय जास्त नव्हतं. तिने अवघ्या 16व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. या पात्रातून विद्या बालनला ओळख मिळाली.
विद्या बालनने टीव्ही मालिकांनंतर तमिळ-तेलगू चित्रपटांमध्येही काम केलं. तिला सिनेमासृष्टीत 'भाला थाको' या बंगाली चित्रपटातून ओळख मिळाली. यानंतर तिने 'परिणीता'सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.