विद्याच्या 'तुम्हारी सुलू' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन लवकरच आपल्या आगामी चित्रपट 'तुम्हारी सुलू' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 14, 2017, 04:23 PM IST
विद्याच्या 'तुम्हारी सुलू' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...   title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन लवकरच आपल्या आगामी चित्रपट 'तुम्हारी सुलू' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात विद्या एक हाऊस वाईफची भूमिका साकारत आहे. मात्र तिला काहीतरी काम करण्याची इच्छा आहे. पण काय काम करावे हे तिला समजत नाही. तिच्या हाऊस वाईफच्या भूमिकेत ती नटखट अंदाजात दिसते. 

रेडिओ प्रोग्रॅममध्ये ती अनेकदा बक्षिसं जिंकते. नंतर तिला रेडिओ जॉकी बनण्याची इच्छा जागृत होते. आणि मग तिचा हाऊस वाईफ ते रेडिओ जॉकीपर्यंतचा प्रवास चित्रपटात पाहायला मिळतो. त्यासाठी ती तिचा आवाज आणि बोलण्याची पद्धत बदलते. 

ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही. कारण चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत गंमतीशीर आणि मजेशीर आहे. चित्रपटात आरजे मलिष्का देखील खास भूमिकेत आहे. हा चित्रपट १७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.