१९२१ टीझर : प्रेक्षकांना पुन्हा घाबरवण्यास विक्रम भट तयार

'१९२०' या सिनेमाच्या चौथ्या पार्टचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

Updated: Dec 11, 2017, 08:52 AM IST
  १९२१ टीझर : प्रेक्षकांना पुन्हा घाबरवण्यास विक्रम भट तयार

मुंबई : दिग्दर्शक विक्रम भट्ट पुन्हा प्रेक्षकांसमोर एक हॉरर सिनेमा घेऊन येत आहे. '१९२०' या सिनेमाच्या चौथ्या पार्टचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज होणार आहे. 

'१९२०' या सिनेमाच्या चौथ्या पार्टचे नाव '१९२१' असणार आहे. करण कुंद्रा आणि जरीन खान ही जोडी या सिनेमात दिसणार आहे. २००८ साली १९२० रिलीज झाली होती. त्यानंतर २०१२ मध्ये '१९२० : इविल रिटर्न्स' आणि २०१६ साली '१९२० : लंडन' हे सिनेमे आले. 

१२ जानेवारीला रिलीज 

१२ जानेवारी २०१८ ला '१९२१ ' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आणखी दोन सिनेमा 

याच दिवशी सैफ अली खान याची 'कालाकांडी' आणि अनुराग कश्यप याची 'मुक्काबाज' देखील रिलीज होणार आहे.