इंडस्ट्री सोडण्याच्या तयारीत असलेला 'हा' अभिनेता रणवीरला भिडणार, 'डॉन 3' मध्ये होणार एन्ट्री?

अभिनेता विक्रांत मेस्सी लवकरच 'डॉन 3' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विक्रांत-रणवीर सिंहसोबत दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 29, 2025, 01:30 PM IST
इंडस्ट्री सोडण्याच्या तयारीत असलेला 'हा' अभिनेता रणवीरला भिडणार, 'डॉन 3' मध्ये होणार एन्ट्री? title=

Don 3 Latest Update : अभिनेता विक्रांत मेस्सीला अभिनय क्षेत्रात 17 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. अभिनेत्याने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या कामाने लोकांना प्रभावित केलं आहे. परंतु, जेव्हा विक्रांतने चित्रपटांमधून ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

तथापि, अभिनेत्याने असेही स्पष्टपणे सांगितले होते की त्याचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर 2025 साली प्रदर्शित होतील. 2025 मध्ये मोठ्या पडद्यावर तो शेवटच्या वेळी चाहत्यांना भेटणार असल्याचे विक्रांतने आपल्या पोस्टद्वारे सांगितले होते. दरम्यान, अशातच 'डॉन 3' मधील खलनायकाच्या भूमिकेसाठी विक्रांत मेस्सीची निवड करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, विक्रांत मेस्सी या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, विक्रांतच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, चित्रपटाचे निर्माते लवकरच विक्रांतच्या नावाची खलनायक म्हणून घोषणा करू शकतात. मात्र, अद्याप या चित्रपटात कास्ट करण्याबाबत अभिनेत्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

विक्रांत-रणवीर दुसऱ्यांदा एकत्र दिसणार 

जर चित्रपट निर्मात्यांनी विक्रांतचे नाव फायनल केले तर अभिनेता रणवीर सिंहसोबत विक्रांत दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याआधी या दोन्ही कलाकारांनी 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लुटेरा' चित्रपटात एकत्र काम केले होते. रणवीरसोबत या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील मुख्य भूमिकेत दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, विक्रांत लवकरच 'डॉन 3' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू शकतो.

'12 वी फेल' चित्रपटातून अभिनेत्याला मिळाली प्रसिद्धी

अभिनेता विक्रांत मेस्सीला '12 वी फेल' या चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटात बिहारमधील गरीब मुलाची संघर्षकथा दाखवण्यात आली होती. त्यानंतर नुकताच अभिनेता 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातील अभिनेत्याचा उत्कृष्ट अभिनय पाहून चाहत्यांनी त्याचे कौतुक केले होते. त्यासोबतच अभिनेत्याने 'सेक्टर 36' मालिकेत देखील दमदार अभिनय केला होता. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x